कोल्हापूर: जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना तातडीने शासनाकडून भरीव मदत मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन पुकारले आहे. खरिपाच्या हंगामात पावसाचा दीर्घकाळ खंड पडल्यामुळे सोयाबीन, भात व भुईमूग यांसारख्या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाचे वेधण्यासाठी आणि शासन दरबारी योग्य वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी गडहिंग्लजमध्ये आंदोलनाचाण पाचवा दिवस अतिशय तापलेला पाहायला मिळाला.
आंदोलनादरम्यान एका बाजूला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढत सहभाग नोंदवला, तर कार्यकर्त्यांनी थेट प्रांतकचेरीवर धडक देत महसूल अधिकारी व तहसीलदारांवर प्रश्नांचा भडीमार केला. प्रशासनाने अद्यापही आंदोलनाची योग्य दखल न घेतल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाची तीव्रता इतकी वाढली होती की, प्रांतकचेरीतील महसूल कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर बोलावून खाली जमिनीवर बसवण्यात आले.
या संपूर्ण आंदोलनावेळी विविध शेतकरी नेते, ग्रामस्थ आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आढावा बैठकीदरम्यान आमदार व काही सदस्यांमध्ये झालेल्या वादावादीमुळे आंदोलक व भाजप कार्यकर्ते यांच्यातही काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा गोंधळ टळला. या आंदोलनानंतर आमदार व नेत्यांनी प्रांतकचेरीसमोर आंदोलकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी आणि नेत्यांनी स्पष्ट केले की, "हे आंदोलन म्हणजे केवळ एक ट्रेलर आहे, अजून मुख्य पिक्चर (चित्रपट) बाकी आहे." जर शासनाने व प्रशासनाने तातडीने गडहिंग्लज तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत केला नाही आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेतली नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही देण्यात आला. तसेच, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची योग्य व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पीककर्ज वसुलीसाठी सक्ती किंवा तगादा न लावण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले, ज्यावर बँकांनी सहमती दर्शवली आहे.
शहर
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
- पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; महिला वकिलांनी मांडल्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी
- पुणे: मोठ्या गाड्यांमधून फिरणाऱ्या अन् बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांना ५ हजार रुपयांचे महत्त्व कळणार नाही: देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- कोल्हापूर: उसाला हमीभाव मिळेपर्यंत मागे हटणार नाही! किणी टोल नाक्यावरील महामार्ग रोको आंदोलन चोवीस तासांनंतरही सुरूच
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- जालना: सरकारी कार्यालयात दिवाळीऐवजी शिमगा! अंबड तहसीलदारांसमोरच लिपिक अन् कोतवालात आर्थिक देवाणघेवाणीवरून तुफान हाणामारी,
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी




























Subscribe to my channel




