पुणे: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' (Belonging: A Journey of Love) या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथित चुकीचे, भ्रामक आणि मानहानीकारक उल्लेख केल्याच्या प्रकरणावरून सावरकरांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी सोनिया गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पुणे येथील वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांच्यामार्फत ही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
विवाद नेमका कशावरून?सोनिया गांधी यांच्या या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक २०१ आणि पृष्ठ क्रमांक ४४३ वरील मजकुरावर सत्यकी सावरकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, या पानांवरील विधाने ऐतिहासिक तथ्यांच्या दृष्टीने चुकीची, दिशाभूल करणारी, विकृत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला व वारशाला बाधा पोहोचवणारी आहेत. विशेषतः पृष्ठ क्रमांक २०१ वरील उल्लेखामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटीश वसाहतवादी सत्ताधाऱ्यांशी कथित संगनमत करणाऱ्यांच्या संदर्भात मांडल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
ऐतिहासिक संदर्भ आणि विकृतीचा आरोप नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, ब्रिटीश राजवटीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दीर्घ कारावास आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये अत्यंत कठोर यातना सहन केल्या. तुरुंगातील त्यांच्या याचिकांबाबतचा उल्लेख करताना तत्कालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी, परिस्थिती आणि सभोवतालच्या घटनांचा विचार न करता केवळ संदर्भहीन विधाने करणे हे त्यांच्या जीवनसंघर्षाचे अर्धवट आणि विकृत चित्र वाचकांसमोर उभे करते. तसेच पृष्ठ २०१ व ४४३ वरील मजकूर एकत्रित वाचल्यास सावरकरांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि त्यांची राजकीय विचारसरणी याबाबत चुकीचा व पूर्वग्रहदूषित समज निर्माण होऊ शकतो, तसेच त्यांच्या संपूर्ण वैचारिक दृष्टिकोनाला केवळ धार्मिक वर्चस्वाच्या विधानापुरते मर्यादित करणे दिशाभूल करणारे आहे.
कायदेशीर नोटीसमध्ये कोणत्या मागण्या? हार्परकॉलिन्स पब्लिशर्स इंडिया (HarperCollins Publishers India) यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील आक्षेपार्ह विधानांबाबत सत्यकी सावरकर यांनी खालील मागण्या केल्या आहेत:
-
संबंधित वादग्रस्त विधानांबाबत लेखी व बिनशर्त माफी मागावी आणि सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे.
-
या विधानांमागील ऐतिहासिक आधार व तथ्ये स्पष्ट करावीत.
-
प्रकाशकाशी चर्चा करून पुस्तकाच्या पुढील आवृत्त्या, पुनर्मुद्रणे आणि डिजिटल/इलेक्ट्रॉनिक आवृत्त्यांमधून आक्षेपार्ह मजकूर दुरुस्त करावा किंवा मागे घ्यावा.
१५ दिवसांची मुदत आणि इशाराया कायदेशीर नोटीसला उत्तर देण्यासाठी आणि आवश्यक पावले उचलण्यासाठी सोनिया गांधी यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत समाधानकारक उत्तर व कारवाई न झाल्यास सक्षम न्यायालय किंवा पुणे जिल्हा न्यायालयात पुढील कायदेशीर कारवाई व याचिका दाखल करण्याचा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, या पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून यापूर्वीच विविध राजकीय पातळ्यांवरूनही निषेध आणि वादग्रस्त विधाने काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती.
शहर
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
- पुणे: जेजुरी–मोरगाव रस्त्यावर काळोखाचा घाला! एसटी बसची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, दोन चिमुकल्यांचे छत्र हरपले!
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
महाराष्ट्र
- पुणे: ग्रँड टूर साठी प्रशासनाचा वेगवान 'गियर'; रस्ते, वाहतूक, सुरक्षा आणि वैद्यकीय नियोजनाचे सुनेत्रा पवार यांचे सक्त निर्देश!
- कोल्हापूर: पहाटेच्या मोजणीवरून नाधवडे शिवारात रणकंदन; बोरवडे आणि उंदरवाडीत शेतकऱ्यांचा रस्त्यावर संताप!
- पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!
- पुणे: बाईक टॅक्सीविरोधात ६० हजार रिक्षांचा चक्काजाम! पुण्यात प्रवासासाठी नागरिकांची मोठी धावपळ आणि तारांबळ
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!



























Subscribe to my channel



