पुणे: शंभराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणाकडे? पुण्यातील ऐतिहासिक सोहळ्याचा निर्णय आज!

पुणे: पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचा निर्णय आज, मंगळवारी (दि. २४) होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत होणार आहे. या शर्यतीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे नाव आघाडीवर आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची बैठक सोमवारी (दि. २३) पार पडली. या बैठकीत संमेलनाच्या रूपरेषेवर प्राथमिक चर्चा झाली आहे. पुण्यात तब्बल २६ वर्षांनंतर साहित्य संमेलनाचे आयोजन होत असल्याने या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी २०१० मध्ये पुण्यात साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे शंभराव्या संमेलनाचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.

अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड यांच्या नावांची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. आज होणाऱ्या मुख्य बैठकीत या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव अधिकृतरीत्या निश्चित केले जाणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *