नवी दिल्ली: देशाच्या अर्थव्यवस्थेने ७.८ टक्क्यांनी मजबूत वाढ नोंदवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एक विशेष रील शेअर करत देशाला संदेश देताना पंतप्रधान मोदींनी जगातील सद्यस्थिती आणि भारताची प्रगती यावर विस्तृत भाष्य केले. तसेच, देशांतर्गत विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
जगभरात संकट, पण भारत वेगाने प्रगतीपथावर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, संपूर्ण जग आज युद्धाच्या छायेत आणि चौफेर संकटात सापडले आहे. जगभरात पुरवठा साखळी (सप्लाय चेन) पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. २०२० मध्ये कोरोनाचे संकट आल्यापासून जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये अद्यापही स्थैर्य आलेले नाही. मात्र, या सर्व प्रतिकूल आणि जागतिक पातळीवरील अनिश्चित वातावरणातही भारताने विकासाचा वेग कायम राखला असून अर्थव्यवस्था वाढीची नवी उंची गाठली आहे. हा भारताच्या सामूहिक शक्तीचा आणि देशवासीयांच्या पुरुषार्थाचा विजय आहे.
'झूठ की गुंज'मधून निराशा पसरवण्याचे काम: एकतर्फा देश विकासाची नवनवीन शिखरे सर करत असताना, दुसरीकडे देशांतर्गत पातळीवर काही लोक निराशेच्या गर्तेत बुडालेले आहेत. 'झूठ की गुंज' (खोट्याचे वातावरण) निर्माण करून सर्वत्र निराशा पसरवण्याचे काम काही घटकांकडून केले जात आहे, असा खोचक टोला पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता लगावला. या सर्व नकारात्मक गोष्टींवर आणि निराशेच्या वातावरणावर मात करत देशाने ७.८ टक्के वाढ शक्य करून दाखवली आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा मंत्र: देशाची ही विकासाची गती केवळ कायमच ठेवायची नाही, तर ती आणखी वाढवायची आहे. यासाठी प्रत्येकाने 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वदेशी' या मंत्रावर जास्तीत जास्त भर देणे गरजेचे आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशवासीयांना संबोधित करताना त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे सुचवले:
-
परदेशात पर्यटनाला जाण्याची किंवा फिरण्याची योजना आखत असाल, तर तसे करणे टाळा.
-
परदेशात जाऊन महागडी डेस्टिनेशन वेडिंग करणे थांबवा.
-
'मेड इन इंडिया' आणि 'लोकल फॉर व्होकल' या मंत्राचा अवलंब करा.
-
कोणतीही अतिआवश्यक गरज नसेल, तर सोने खरेदी करणे टाळा.
पुढच्या पिढीसाठी विकसित भारताचे ध्येय: आपण स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेच्या मार्गावर जेवढा जास्त भर देऊ, तेवढा देशाचा पाया बळकट होईल. हाच वेग आणि समृद्धी आपल्याला पुढे न्यायची आहे. येत्या काळात सक्षम आणि समृद्ध असा 'विकसित भारत' पुढील तरुण पिढीच्या हाती सुपूर्द करायचा आहे, असा दृढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




