मुंबई: सप्टेंबर महिन्याची सुरुवात होताच मुंबईकरांना महागाईचा अत्यंत जोरदार फटका बसला आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर तब्बल ९ रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबईतील सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागली असून, ऐन सणासुदीच्या हंगामात घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुट्या दुधाचे दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपयांवर: 'मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन'ने दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील घाऊक आणि किरकोळ दूध दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीमुळे यापूर्वी ९३ रुपये प्रति लिटर असणारे सुट्या दुधाचे दर आता थेट १०२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे किरकोळ विक्रीचे दर प्रति लिटर ११० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईसारख्या महानगरात घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे.
दूध दरवाढीमागची प्रमुख कारणे: दूध उत्पादक आणि विक्रेत्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, मागील काही महिन्यांत दुधाच्या उत्पादनात आणि व्यवस्थापनामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दरवाढीची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत: १. पशुखाद्याचे वाढलेले दर: मागील वर्षभरात पशुखाद्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये दाणा, तूरचुणी, चणाचुणी, ढेमसा, चारा आणि पेंड यांच्या किमती तब्बल २५ टक्क्यांनी वधारल्या आहेत. २. जनावरांच्या खरेदी किमतीत वाढ: दुधाळ जनावरे खरेदी करणे आणि त्यांचे संगोपन करणे आता पूर्वीपेक्षा खूप महाग झाले आहे. ३. अन्न व औषध प्रशासन (FDA) कडक कारवाई: नुकतीच अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) भेसळयुक्त दुधाविरोधात अतिशय कठोर कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे बाजारात अस्सल आणि शुद्ध दुधाची मागणी वाढली असून त्याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे.
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भार: सध्या सप्टेंबर महिन्याची सुरुवात होत असून अवघ्या काही दिवसांतच गोपाळकाला, लाडक्या बाप्पाचे आगमन म्हणजेच गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्र आणि दिवाळी यांसारखे मोठे सण व उत्सव सुरू होत आहेत. या सणासुदीच्या काळात दूध, दही, खवा, तूप, पनीर आणि विविध प्रकारच्या मिठाईची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. मात्र, दुधाच्या मुळ किमतीतच ९ रुपयांची वाढ झाल्यामुळे फराळ, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे भाव देखील १० टक्क्यांहून अधिक वाढण्याची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



