
Wayanad Landslides Update : केरळच्या वायनाडमधील मेप्पाडीजवळ झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत २५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०० जण अजूनही बेपत्ता आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या २०० जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. पण मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे घटनास्थळी भेट देणार आहेत.
केरळच्या वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये सोमवारी चार गावांमध्ये भूस्खलन झाले. या भूस्खलनामध्ये चारही गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. भूस्खलनामध्ये मुंडक्कई, चूरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांमध्ये मोठं नुकसान झाले. या गावातील सर्व घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांची संपूर्ण कुटुंब या भूस्खलनात बेपत्ता झाले. या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून आपला माणूस वाचेल या आशेने ते त्याठिकाणी रडत बसले आहेत.
|
Dehradun : हिमाचल, उत्तराखंडमध्ये ढगफुटी; १६ जणांचा मृत्यू, ५० बेपत्ता |
भूस्खलन झालेल्या ठिकाणावर एनडीआरएफ, लष्कराचे जवान, स्थानिक प्रशासनामार्फत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ३ हजारांपेक्षा जास्त जण बचावकार्याचे काम करत आहेत. पण मुसळधार पाऊस, चिखल, झाडांचे मोठ-मोठे तुकडे, खराब हवामान यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर चूरलमाला आणि मुंडक्कईमधील पूल पाण्यासोबत वाहून गेला. आता लष्कराचे जवान हा पूल बनवण्याचे काम करत आहे. जेणेकरून बचावकार्य वेगाने होईल.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी नवी दिल्लीहून वायनाडला रवाना झाले आहेत. ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे पोहोचत आहेत. प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत वायनाडला भेट देण्यासाठी आल्या आहेत. दोघेही बुधवारी वायनाडला जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांना वायनाड दौरा पुढे ढकलावा लागला. आज ते वायनाडला येऊन घटनास्थळाला भेट देणार आहेत.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




