
Pune : कुख्यात गुंड निलेश घायवळ याला धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्यावर आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ याला फरार घोषित करण्यात आलं आहे. तसेच निलेश घायवळ याला न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. पण तो कोथरुड येथील गोळीबार प्रकरणानंतर विदेशात पळून गेल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्या साथीदाराच्या घरातून तब्बल 400 काडतुसे शोधून काढले होते. यामध्ये 200 जिवंत तर 200 काडतुसे वापरल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांच्या हाती त्यांच्या पुंगळ्या लागल्याची माहिती होती. त्यानंतरही पोलिसांचा सखोल तपास सुरु होता. घायवळ याच्याबाबत तपासातून नवनवीत माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याचा पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे. त्यामुळे आता त्याच्याविरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
निलेश घायवळ याला न्यायालयाकडून घोषित करण्यात आल्यानंतर आता त्याच्या विरोधात मोठी कारवाई होणार आहे. निलेश घायवळ याची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या व्यक्तीचं नाव वापरून सिमकार्ड खरेदी करून त्याचा वापर केल्याप्रकरणी घायवळवर गुन्हा दाखल होता. या याप्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये आज पुणे पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आलं आहे.
|
PMC Abhay Yojna : अभय योजनेचा वेग मंदावला; आतापर्यंत फक्त १५७ कोटींचीच वसुली |
कोथरूडमध्ये किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी परदेशात पळून गेलेला कुख्यात आरोपी निलेश घायवळला पुणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. इंटरपोलमार्फत 'ब्लू कॉर्नर' नोटीस काढल्यानंतरही घायवळ सापडला नसल्याने त्याच्या प्रत्यार्पणासाठी थेट 'रेड कॉर्नर' नोटीस काढण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केली आहे.
या प्रकरणात टोळीप्रमुख निलेश बन्सीलाल गायवळसह (वय ४९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) एकूण नऊ जणांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घायवळचा शोध घेत असताना, तो नव्वद दिवसांच्या व्हिसावर परदेशात पसार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पुणे पोलिसांनी 'इंटरपोल'मार्फत घायवळविरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस बजावली; तसेच घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला.
दरम्यान, ब्रिटन उच्चायुक्तालयासमवेत झालेल्या पत्रव्यवहारात घायवळ पर्यटन व्हिसावर लंडनमध्ये असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. त्यामुळे घायवळला फरार घोषित करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. तो मंजूर झाल्याने आता घायवळविरोधात 'रेड कॉर्नर' नोटीस काढून त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. 'निलेश घायवळला न्यायालयाने फरार घोषित केल्याने त्याची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे,' असे परिमंडल तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!































Subscribe to my channel




