
Pune : रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर एकट्या महिलांना हेरून त्यांची छेड काढायचा. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात विमानतळ पोलिसांना यश आले आहे. तब्बल २४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी या विकृत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सागर राम सोनवणे (वय २२, रा. भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव, गणेश पार्क परिसरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली होती. एका दुचाकीस्वार अज्ञात तरुणाने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला होता.याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) कलम ८ व १२ अन्वये गुन्हा (क्र. ६२४/२०२५) दाखल करण्यात आला होता. या भागात अशा घटना वारंवार घडत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
|
Pune : कोर्टात फरार म्हणून घोषित! निलेश घेगावळवर आता सर्वात कठोर कारवाईची शक्यता वाढली |
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीला तात्काळ पकडण्याचे आदेश दिले. आरोपीचा कोणताही थांगपत्ता नसताना तपास पथकाने विमाननगर, विश्रांतवाडी, दिघी आणि भोसरी या परिसरातील तब्बल २४५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आणि सापळा रचून त्याला शिताफीने अटक करण्यात आली.
आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे समोर आलं. हा विकृत गुन्हेगार कशा पद्धतीने महिला हेरायचा आणि त्याची गुन्ह्याची पद्धत कशी होती हे ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले. पोलीस तपासात आरोपी सागर सोनवणे याची गुन्हे करण्याची पद्धत समोर आली आहे. तो रात्रीच्या वेळी दुचाकीवरून फिरत असे. सुनसान रस्ते किंवा अंधार असलेल्या ठिकाणी एकटी महिला किंवा मुलगी दिसली की तो त्यांचा विनयभंग करून वेगाने पळून जात असे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो सीसीटीव्ही नसलेले रस्ते किंवा आडवाटांची निवड करायचा. मात्र, पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत सागरने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत ५ वेळा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे. याव्यतिरिक्त इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही त्याने असे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे आणि एसीपी प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने ही कामगिरी फत्ते केली.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




