२४ एप्रिल २०२६. भारतीय राजकारणात एका नव्या ‘ऑपरेशन लोटस’ची चर्चा रंगली. आम आदमी पार्टीचे (AAP) राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत एकूण सात राज्यसभा खासदार (AAP च्या १० पैकी सुमारे दोन-तृतीयांश) भाजपमध्ये विलीन झाले. हा फक्त पक्षांतर नाही, तर ‘भ्रष्टाचार विरोधी’ नारा देणाऱ्या पक्षातील नैतिकतेचा अंतिम पतन दिसतोय.
घटना आणि तथ्य
- राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, हरभजन सिंह, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता यांनी राजीनामा दिला.
- भाजप अध्यक्ष नितिन नवीन यांच्या उपस्थितीत चड्ढा यांनी पक्ष प्रवेश केला.
- चड्ढा म्हणाले, “आप’मध्ये प्रामाणिक राजकारण संपले आहे, पक्ष मूळ मूल्यांपासून दूर गेला आहे.”
पण इथे एक मोठी आयरोनी आहे.
काही वर्षांपूर्वी राघव चड्ढा यांनी भाजपला “अनपढ़ गुंडों की पार्टी” (अशिक्षित गुंडांची पार्टी) म्हटले होते. तो जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या पक्षाला ते ‘गुंडांचा’ म्हणत होते, त्याच पक्षात आज ते सामील झाले आहेत. हा बदल ‘परिपक्वता’ आहे की ‘सत्तेची हाव’? हे प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.
आप चा नैतिक पतन
आप २०१२ मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून उदयास आला. “पारदर्शकता, जनसेवा, सत्ता नाही” हे ब्रीद होते. मात्र दिल्लीतील सत्ता मिळाल्यावर पक्षावर भ्रष्टाचार, कुटुंबवाद, एकछत्री नेतृत्व (केजरीवाल) आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप वाढले. राघव चड्ढा यांच्यासारख्या सुशिक्षित, बोलक्या नेत्याला पक्ष सोडावा लागणे हे आपसाठी मोठा नैतिक धक्का आहे.
पंजाब २०२७ च्या निवडणुकीपूर्वी ही फूट पक्षाला जवळजवळ संपवणारी ठरू शकते. भगवंत मान यांनी “BJP ज्यांच्याशी हात मिळवते त्यांना संपवते” असे म्हटले, तरी वस्तुस्थिती अशी आहे की आप आता संसदेत आणि जनमानसात कमकुवत झाला आहे.
राघव चड्ढा : संधीसाधूपणा की वास्तववाद
राघव चड्ढा हे पूर्वी आपचे ‘चेहरे’ होते. ते बोलके, मध्यमवर्गीय आणि ‘ईमानदार’ इमेजचे प्रतीक होते. मात्र आता ते ज्या पक्षाला ‘गुंडांचा’ म्हणत होते, त्याच्यात सामील झाले. हा बदल ‘देशातील स्थिर सरकार’ पाहून झाला, की वैयक्तिक राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी?
राजकारणात U-Turn सामान्य आहेत, पण ज्यांनी स्वतः नैतिकतेचा नारा दिला, त्यांचा हा बदल फारसा प्रेरणादायी वाटत नाही. आज ते भाजपला ‘स्थिर’ म्हणतात, उद्या काय म्हणतील याची गॅरंटी नाही.
राघव चड्ढा यांचे पक्षांतर हे आप च्या अंतर्गत संकटाचे दर्शन घडवते. ज्या पक्षाने ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’चा नारा दिला, तोच पक्ष आता स्वतः अंतर्गत भ्रष्टाचार आणि फुटीने ग्रासला गेला आहे.
राजकारणात सत्ता आणि नैतिकता यांचा समतोल साधणे कठीण आहे. पण ज्यांनी एकदा ‘गुंडांची पार्टी’ म्हटले, ते स्वतः त्या पक्षात जाणे हे फक्त ‘परिपक्वता’ नव्हे, तर राजकीय सुविधावाद (संधीसाधूपणा) दिसते.
- विश्वजीत माने
शहर
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
महाराष्ट्र
- मुंबई: 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात मुंबईत बाप्पाचे आगमन; सार्वजनिक गणेशोत्सवाची लगबग सुरू
- पुणे: खर्च भागत नाही म्हणून तरुणाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव; सुटकेसाठी कुटुंबीयांकडे मागितले ५ लाख रुपये
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




