
Pune : घर तेही पुण्यात आपल्या बजेट मध्ये हवंय ना ? मग हा म्हाडाचा 1, 1.5 BHK फ्लॅट नक्की प्रयत्न करा पाहा.. प्रशस्त हॉल, वेंटिलेटेड बाल्कनी आणि शांत परिसर असं सगळं काही आहे इथे. सगळ्यात खास म्हणजे म्हाडाच्या या घरांची किंमत खूपच परवडणारी आहे. मित्रांनो, आजकाल 1.5 BHK फ्लॅटसाठी इतकी परवडणारी किंमत क्वचितच मिळते. आणि जर तुम्हाला 1 BHK हवा असेल, तर तो तर अजूनच कमी किंमतीत उपलब्ध आहे. लोकेशन पण जबरदस्त आहे. रोजच्या प्रवासासाठी सोयीचं, शाळा, बाजार, आणि बसस्टॉप हे पण जवळ आहे. या घरांसाठी अर्ज केल्यास याठिकाणी घरं लागण्याचे चान्सेस जास्त असल्याचं एका युट्युबरने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. या योजनेसाठी अर्जाची तारीख 11 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून अंतिम अर्जाची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. चला जाणून घेऊया लोकेशन, अर्ज प्रक्रिया आणि इतर संपूर्ण माहिती..
म्हाडाचा 1.5 BHK फ्लॅट माहिती
पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात मारुंजी येथे म्हाडाने 814-A व 814-B अशीआना निवास हा आकर्षक हाऊसिंग प्रकल्प उभारला आहे. हा प्रकल्प उत्तम लोकेशनवर असून हिंजवडी आयटी पार्क, मुंबई-बंगळुरू हायवे आणि आसपासच्या महत्त्वाच्या सुविधांपासून अगदी जवळ आहे. या प्रकल्पातील घरं आधुनिक सोयी-सुविधांसह सुसज्ज असून, कुटुंबासाठी योग्य अशा 1.5 BHK आणि 1 BHK कॉन्फिगरेशनची घरे उपलब्ध आहेत.
घराचे बिल्टअप क्षेत्रफळ 72.01 चौ.मी. आणि कार्पेट क्षेत्र 47.24 चौ.मी म्हणजेच 508 स्क्वेअर फुट इतका आहे. या फ्लॅटची एकूण किंमत 20,70,400 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे, तर लॉटरीसाठी अर्ज करताना अनामत रक्कम (EMD) 20,000 हजार भरावी लागेल. या प्रकल्पात एकूण 65 घरे उपलब्ध असून,
या प्रकल्पाचा RERA क्रमांक P52100054148 असा आहे. सर्व श्रेणीतील अर्जदारांसाठी (AR, CG, DF, EX, FF, GP, JR, ME, MP/MLA/MLC, NT, PH, SC, SG, ST) ही घरे खुली आहेत.
म्हाडाचा 1 BHK फ्लॅट माहिती
येथील 814-A अशीआना निवास, मारुंजी या प्रकल्पातील 1BHK घरांचे बिल्टअप क्षेत्र 49.87 चौ.मी. असून, कार्पेट क्षेत्र 31.92 ते 32.38 चौ.मी. (सुमारे 343 ते 348 चौ.फुट) इतके आहे. घराची एकूण किंमत ₹14,33,800 ठेवण्यात आली असून, अर्ज करताना अनामत रक्कम (EMD) 20,000 रुपये भरावी लागेल. यात 1 BHK ची एकूण 107 घरे उपलब्ध आहेत.
प्रकल्पाचा RERA क्रमांक P52100054148 असून, विविध श्रेणीतील अर्जदारांसाठी (AR, CG, DF, DT, EX, FF, GP, JR, ME, MP/MLA/MLC, NT, PH, SC, SG, ST) ही घरे खुली आहेत.
या प्रकल्पातील सुविधा
या प्रकल्पात रहिवाशांच्या दैनंदिन गरजा आणि आराम लक्षात घेऊन उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी CCTV सिक्युरिटीची सोय असून, प्रत्येक टॉवरमध्ये लिफ्ट (Elevator) ची सुविधा आहे. फिटनेस प्रेमींसाठी जॉगिंग ट्रॅक, तर मुलांच्या खेळासाठी खास किड्स प्ले एरिया तयार करण्यात आला आहे. वाहनांसाठी पुरेशी पार्किंग स्पेस, अखंडित वीजेसाठी पॉवर बॅकअप आणि सतत पाणीपुरवठ्याची सुविधा (Regular Water Supply) उपलब्ध आहे. या सर्व सुविधा मिळून हा प्रकल्प आधुनिक, सुरक्षित आणि कुटुंबासाठी आदर्श निवासस्थान बनवतात.
प्रकल्पा पासून महत्त्वाच्या ठिकाणांचे अंतर
या प्रकल्पाचे लोकेशन अत्यंत सोयीस्कर असून पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत सहज पोहोचता येते. म्हाडाच्या या प्रकल्पापासून पुणे रेल्वे स्टेशन 21.8 किमी, विमानतळ 28.4 किमी, स्वारगेट 23.2 किमी आणि शिवाजीनगर बस स्थानक 19.5 किमी अंतरावर आहे. पुणे–मुंबई महामार्ग फक्त 5 किमीवर असल्याने प्रवास सोपा आणि जलद होतो. शिक्षण संस्थांबाबत बोलायचं झालं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 15.4 किमी, JSPM कॉलेज 7.7 किमी, इंदिरा कॉलेज 6.2 किमी आणि रायझिंग स्टार स्कूल फक्त 3.3 किमी अंतरावर आहे. परिसरात डी मार्ट (6.7 किमी), मणिपाल हॉस्पिटल (10 किमी) आणि हिंजवडी आयटी पार्क (4 किमी) सारख्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने हे ठिकाण राहण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी अत्यंत आकर्षक ठरते.
या घरांसाठी अर्ज कुठे करणार?
814-B अशियाना निवास (MHADA पुणे लॉटरी 2025)योजनेत अर्ज करण्यासाठी https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune/ ही पुणे म्हाडा लॉटरीची अधिकृत वेबसाईट आहे.
लॉटरीत घर लागल्यानंतर कधी मिळणार?
814-A व 814-B अशीआना निवास प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख, म्हणजेच ग्राहकांना ताबा (possession) मिळण्याची अधिकृत डेडलाइन, 28 जानेवारी 2029 अशी नमूद करण्यात आलेली आहे. जर तुम्ही तीन वर्षे थांबायला तयार असाल तर या घरांचा विचार नक्की करू शकता.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


