पुणे: मोठ्या भावाकडून पैसे उकळण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. कुटुंबीयांना आपले अपहरण झाल्याचा विश्वास बसावा यासाठी या तरुणाने ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ पाठवला. एवढेच नव्हे, तर आपली सुटका हवी असेल तर तब्बल पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणीही केली. मात्र, उत्तर प्रदेशपोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर अवघ्या काही तासांत या बनावाचा पर्दाफाश झाला.
ओम प्रकाश गौरीशंकर (वय १९) असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील बेबेरू तालुक्यातील जालालपूर गावचा रहिवासी आहे. काही कारणास्तव तो पुण्यात आला होता. पुण्यात वास्तव्यास असताना कामधंदा नसल्याने तो आर्थिक अडचणीत सापडला होता. घरून पैसे मागूनही खर्च भागत नसल्याने त्याने कुटुंबीयांकडून पैसे मिळवण्यासाठी एक शक्कल लढवली. गौरीशंकरने आपल्या कुटुंबीयांना आणि मोठ्या भावाला आपण पुण्यात अपहरणकर्त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. आपले अपहरण झाल्याचा विश्वास कुटुंबीयांना बसावा यासाठी त्याने स्वतःचा एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडताना दिसत होता. त्यानंतर आपली सुखरूप सुटका हवी असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने कुटुंबीयांना सांगितले.
मुलाचे अपहरण झाल्याचे समजताच कुटुंबीय घाबरले. त्यांनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर शाहजहांपूर पोलिसांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पुण्यात एका तरुणाचे अपहरण झाले असून, त्याच्या सुटकेसाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
१७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पुणे पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक तसेच विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी तरुणाचा शोध घेण्यासाठी कामाला लागले. उत्तर प्रदेश पोलिसांनी गौरीशंकरचा मोबाईल क्रमांक पुणे पोलिसांना दिला होता. त्याच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात करण्यात आली. तपासादरम्यान तो पुण्यातील खडकी परिसरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खडकीच्या दिशेने धाव घेतली. रात्रीच्या गस्तीवर असलेले अधिकारी, मार्शल आणि बंडगार्डन पोलिसांनी मिळून खडकी परिसरातील क्राउन प्लाझा लॉजिंग येथे शोध घेतला.
पोलिस लॉजमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना धक्कादायक वास्तव समोर आले. तेथे कोणतेही अपहरणकर्ते नव्हते. उलट, ज्याचे अपहरण झाल्याची तक्रार होती, तोच गौरीशंकर लॉजमध्ये आरामात बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच आपल्या भावाला आणि कुटुंबीयांना अपहरण झाल्याचे व्हिडिओ पाठवल्याची कबुली दिली. पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याचे चौकशीत समोर आले. कुटुंबीयांकडून पाच लाख रुपये उकळण्यासाठी रचलेला हा संपूर्ण बनाव पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत उघडकीस आला.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




