गोवा: विवाह नोंदणी तसेच इतर प्रशासकीय सेवांसाठी नागरिकांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्यात आली आहे. 'एनीव्हेअर रजिस्ट्रेशन' या संकल्पनेअंतर्गत नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार असून, इतर राज्यांतील तसेच विदेशी नागरिकांनाही गोव्यात विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. म्हापसा येथील बार्देश नागरी उपनिबंधक कार्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले, त्यानंतर ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्याला विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसोझा, माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष व आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, राज्य निबंधक आएशा वायंगणकर, अतिरिक्त निबंधक शर्मिला गावकर, मुख्यालयातील उपनिबंधक सोनिया हळर्णकर आणि दक्षिण जिल्हा निबंधक सूरज वेर्लेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, "म्हापशात सर्व सरकारी कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी 'बार्देश भवन'चे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांना चांगल्या आणि दर्जेदार नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे." एकीकडे विवाह नोंदणीसारख्या महत्त्वाच्या सेवा अधिक सुलभ करण्यावर भर दिला जात असतानाच, दुसरीकडे व्यावसायिक आस्थापनांमधील सुरक्षिततेबाबतही मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका मांडली. कळंगुट येथील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खासगी व्यावसायिकांनी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले असून संबंधितांना योग्य ती भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक सरकारी कार्यालय सुसज्ज आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त असावे, असा सरकारचा आग्रह असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, "अनेक सरकारी कार्यालये यापूर्वी मोडकळीस आलेल्या ठिकाणी कार्यरत होती. ती सर्व कार्यालये टप्प्याटप्प्याने नवीन जागी स्थलांतरित करण्यात आली आहेत. म्हापशाच्या उपनिबंधक कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत."
विवाह नोंदणीसाठी तसेच 'सेल डीड' किंवा इतर महत्त्वाच्या दस्तऐवजांच्या नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता उत्तम सोय होणार आहे. गोव्यात विदेशी नागरिक तसेच इतर राज्यांतील नागरिकांचीही विवाह नोंदणी केली जाते; मात्र त्यांना त्यासाठी निर्धारित शुल्क आकारले जाते. इतर अनेक राज्यांमध्ये विवाह नोंदणीची सक्ती नसली तरी गोव्यात विवाह नोंदणी कायद्याने अनिवार्य आहे, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
शहर
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ओपन हार्ट सर्जरीचा धोका टळला अकरावी दहावी शस्त्रक्रिया यशस्वी करत कोल्हापूरचे सीपीआर रुग्णालय राज्यात अव्वल
- रायगड: जागतिक मंचावर सुवर्णतेज! शिरवलीच्या शौर्या निलेश पवारची जागतिक थायबॉक्सिंग स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णभरारी
- पुणे: ई-बाईक टॅक्सीविरोधात पुण्यातील दीड लाख रिक्षाचालकांचे २३ नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन; राज्यातही संपाची हाक
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा




























Subscribe to my channel



