यवतमाळ: जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे एका अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणाऱ्या घटनेत खेळता खेळता बंद कारमध्ये अडकलेल्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा गुदमरून व उकाड्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे एरणीवर आला आहे. मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव अंश सुरज केळझरकर (वय ४ वर्षे) असे आहे.
मिळालेल्या सविस्तर अधिकृत माहितीनुसार, घटना घडलेल्यागंभीर झाली. उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. १७) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंश हा आपल्या घराबाहेर इतर मुलांसोबत खेळत होता. खेळता खेळता तो घराशेजारी उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाजवळ (कार) गेला आणि नकळतपणे त्या कारच्या आतमध्ये शिरला. मात्र, दुर्दैवाने कारच्या आतमधून दरवाजा उघडता न आल्यामुळे तो गाडीतच अडकून पडला. बराच वेळ तो घरासमोर किंवा आजूबाजूला दिसत नसल्याने कुटुंबियांनी सुरुवातीला तो जवळच कुठेतरी खेळत असेल असा समज करून फारशी शोधाशोध केली नाही. मात्र, काही वेळानंतरही तो परत न आल्याने कुटुंबियांनी त्याची कसून शोधाशोध सुरू केली.
काही वेळाने जेव्हा शेजाऱ्यांच्या उभ्या असलेल्या कारजवळ जाऊन पाहिले, तेव्हा अंश कारच्या आतमध्ये अत्यंत बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बाहेरील कडक ऊन आणि कारचे दरवाजे बंद असल्यामुळे आतील हवेचे तापमान वाढले होते आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे व गुदमरल्यामुळे त्याची प्रकृती अतिशय खालावली होती. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला कारमधून बाहेर काढून उपचारासाठी घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. परंतु, प्राथमिक उपचारादरम्यान तेथे ऑक्सिजन आणि पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचा व रुग्णवाहिका मिळण्यास उशीर झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुग्णवाहिकेमार्फत अंशला तातडीने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील बालरोग तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, रुग्णालयात आणण्यापूर्वीच साधारण दीड ते दोन तास आधीच त्याचा गुदमरून मृत्यू झाला असावा, कारण मुलाचे हात-पाय कडक झाले होते आणि डोळ्यांच्या बाहुल्याही सुकल्या होत्या. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: मुरुम चोरी पकडल्याचा राग; देऊळगाव राजे येथे तलाठ्याला राग अनावर, दोघांवर गुन्हा दाखल!
- मुंबई: महाराष्ट्र हवामान अंदाज राज्यात पावसाचा जोर वाढणार! विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा, १३ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी!
- नाशिक: गणपती विसर्जनावेळी मोठा अनर्थ; सटाण्यात खासगी क्लासच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू, गावात शोककळा!
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
महाराष्ट्र
- पुणे: मुरुम चोरी पकडल्याचा राग; देऊळगाव राजे येथे तलाठ्याला राग अनावर, दोघांवर गुन्हा दाखल!
- मुंबई: महाराष्ट्र हवामान अंदाज राज्यात पावसाचा जोर वाढणार! विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा, १३ जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी!
- नाशिक: गणपती विसर्जनावेळी मोठा अनर्थ; सटाण्यात खासगी क्लासच्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून करुण मृत्यू, गावात शोककळा!
- गोवा: गणेशोत्सवाला 'ओमकार' हत्तीच्या त्रासाचे ग्रहण; गणपतीची आरती करायची की पिके वाचवायची? शेतकरी आक्रमक
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!


























Subscribe to my channel




