नाशिक: जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नामपूर येथे गणपती विसर्जनादरम्यान एक अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी दुर्घटना घडली आहे. एका खासगी शिकवणी वर्गाच्या (Private Coaching Class) गणपती विसर्जनासाठी मोसम नदीवरील बंधाऱ्यावर गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोघांचा पाण्यात बुडून करुण अंत झाला आहे. अथर्व दीपक पगार (वय १७, रा. उत्तराणे) आणि प्रसाद दादाभाऊ वाघ (वय १७, रा. नामपूर) असे या दुर्दैवी तरूणांची नावे असून, या घटनेमुळे नामपूरसह संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
घटना नेमकी कशी घडली? नामपूर येथील एका खासगी क्लासमधील बारावीचे काही विद्यार्थी दुपारी मोसम नदीवरील बंधाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. या विसर्जनादरम्यान अथर्व आणि प्रसाद हे दोघे पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते अचानक बुडू लागले. त्यांना पाण्यात बुडताना पाहून उपस्थितांमध्ये एकच तारांबळ उडाली. नागरिकांनी तातडीने त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र पाण्याची खोली अधिक असल्यामुळे त्यांना वाचवण्यात अपयश आले.
बचाव पथकाचे प्रयत्न आणि पोलिसांत तक्रार: घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी मोठी गर्दी केली. त्यानंतर तातडीने मालेगाव येथील आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने नदीत शोधमोहीम राबवून दोन्ही विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढले; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी नामपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, मृत अथर्वचे वडील कमलाकर पगार यांनी दिलेल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. क्लासचे संचालक विवेक अशोक पाटील यांनी पालकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता विद्यार्थ्यांना गणपती विसर्जनासाठी नदीवर नेले होते, असा दावा त्यांनी केला. या विसर्जन कार्यक्रमाच्या वेळी क्लासमधील दोन शिक्षिका आणि १० ते १५ विद्यार्थी उपस्थित असल्याचेही जबाबात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवणाऱ्या संबंधित क्लासचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संतापलेल्या नातेवाईक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



