गणेशोत्सवात कोकण प्रवाशांना मोठा दिलासा! मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वेला वीर आणि खेडदरम्यान सापे वामने आणि विन्हेरे येथे नवीन थांबे मंजूर

लाडक्या बाप्पाच्या गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि गणेशभक्तांच्या प्रवासाची लगबग सुरू झाली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी आणि उपलब्ध गाड्यांवर येणारा ताण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि कोकणदरम्यान धावणाऱ्या विशेष गणपती गाडीला (Mumbai-Sawantwadi Special Train) कोकण रेल्वे मार्गावरील वीर आणि खेड स्थानकांदरम्यान असलेल्या सापे वामने आणि विन्हेरे या दोन्ही स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या नव्या निर्णयामुळे सापे वामने, करंजाडी, विन्हेरे तसेच या परिसरातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील हजारो गणेशभक्तांना आणि चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या विशेष गाड्यांचे थांबे मर्यादित असल्यामुळे परिसरातील प्रवाशांना नजीकच्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर जावे लागत होते, परंतु आता स्थानिक पातळीवरच थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर, सोयीस्कर आणि विनासायास होणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *