अमरावती: स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन हॉस्पिटल) नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) घडलेल्या भीषण अग्निकांडात आणि स्फोटात तीन निष्पाप नवजात बालकांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेला १० दिवस उलटून गेले आहेत, तरीही या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई होणार आणि नेमका चौकशी अहवाल कधी जाहीर होणार, याबाबत प्रशासन अजूनही मौन बाळगून आहे. "आमच्या चिमुकल्या बाळाच्या मृत्यूस नेमके कोणाचे हलगर्जीपण जबाबदार?" असा संतप्त सवाल मृत बालकांच्या दुःखी व संतापलेल्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधील एसएनसीयू विभागात पहाटेच्या सुमारास अचानक व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट व स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्दैवी दुर्घटनेत धुराने गुदमरून आणि भाजल्यामुळे तीन नवजात बालकांचा जागीच कोमेजून मृत्यू झाला होता, तर प्रशासकीय यंत्रणेच्या या ढिसाळ कारभारावर सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेच्या गांभीर्या Mर ओळखत राज्य सरकारकडून व जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दुर्घटना घड होऊन १० दिवस उलटल्यानंतरही या चौकशी समितीचा अंतिम अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
या प्रकरणी राज्याच्या राजकीय वर्तुळातून तसेच विरोधकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा, व्हेंटिलेटरच्या पुरवठ्यासाठी जबाबदार असणाऱ्या कंपन्या (उदा. शिल्लर कंपनीचे व्हेंटिलेटर) आणि सुरक्षेच्या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडित कुटुंबीय आणि विविध राजकीय नेत्यांनी केला आहे. दरमहा नियमित अहवाल पाठवणारे वरिष्ठ अधिकारी आणि विभागीय उपसंचालक कार्यालय या दुर्घटनेनंतर केवळ कागदी घोडे नाचवत असून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, आपल्या नवजात बाळांना गमावलेल्या माता आणि पित्यांचा आक्रोश अद्याप थांबलेला नाही. "घटना घडून १० दिवस झाले, परंतु अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि चौकशीचा अहवालही समोर आलेला नाही, मग आमच्या बाळांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे?" असा सवाल करत पालकांनी प्रशासनाकडे तातडीने अहवाल जाहीर करण्याची आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




