
Baramati : बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय मुलाचा त्याच्याच वडिलांनी खून केला आहे. विजय भंडलकर याने त्याचा मुलगा पियुष हा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात त्याचं डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला. १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुष भंडलकरची आजी शालन गणेश भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. वडगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला ‘तू अभ्यास करत नाहीस’, ‘सारखा बाहेर खेळत असतोस’, ‘माझी इज्जत घालवणारा दिसतोयस’, असे म्हणत त्याला मारहाण केली. मारहाण केल्यानंतही विजयचा राग शांत झाला नाही म्हणून त्याने पियुषचा त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले. यात चिमुकल्या पियुषचा मृत्यू झाला. पियुषची आजी हे सर्व पाहत होती, परंतु तिने मुलगा विजयला अडवलं नाही. त्यानंतर विजयच्याच सांगण्याप्रमाणे शालन भंडलकर यांनी ‘आमचा नातू पियुष चक्कर येवून पडला’ अशी अफवा गावभर उडवली. तर, संतोष भंडलकर याने डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेलं.
|
|
विजयच्याच सांगण्यावरून संतोषने डॉक्टरांना पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुषची प्राथमिक तपासणी करून त्याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला. मात्र, पियुषला प्राथमिक आरोग्य केंद्रात न नेता आणि मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगता विजयने अंत्यविधीची तयारी सुरू केली. मयताचे शवविच्छेदन न करता नातेवाईकांना बोलावून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने विजयने लवकरात लवकर अत्यंविधी उरकून घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



