
Wayanad landslides linked to warming Arabian Sea : केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेमागे अतिवृष्टी हेच प्राथमिक कारण असल्याचे निरीक्षण भूशास्त्र, पर्यावरण संशोधक, अभ्यासकांनी नोंदवले आहे. सखोल अlभ्यासाअंतीच अन्य कारणे समोर येऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले असून, माळीण येथे झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशीच वायनाड येथे भूस्खलन होण्याचा दुर्दैवी योगायोग घडला.
वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलनाची दुर्घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. अद्यापही अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), लष्कराचे जवान यांच्या मदतीने बचावकार्य करण्यात येत आहे. मात्र मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती मिळत आहे.
|
Pune : धरणांच्या परिसरात रात्रभर संततधार, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला |
इस्रोने तयार केलेल्या ‘लँडस्लाइड ॲटलास ऑफ इंडिया’नुसार केरळचा समावेश भूस्खलनप्रवण राज्यांमध्ये होतो. भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती आहे. भूस्खलनाच्या घटना प्रामुख्याने माती, खडक, भूविज्ञान आणि उताराची अनुकूल परिस्थिती असलेल्या डोंगराळ भागात घडतात. उतारावरून खडक, दगड, मातीच्या अचानक होणाऱ्या हालचालींना भूस्खलन म्हटले जाते. अतिवृष्टी, भूकंप, बर्फ वितळणे आणि पूर अशी भूस्खलनाची काही नैसर्गिक कारणे आहेत. तसेच उत्खनन, डोंगरफोड, वृक्षतोड अशा मानवी हस्तक्षेपांमुळेही भूस्खलन होऊ शकते.
केरळमध्ये अशा स्वरूपाचे भूस्खल या पूर्वीही झाले आहे. केरळ पश्चिम घाटाच्या दक्षिण भागात आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडून माती वाहून गेल्याने भूस्खलन झाल्याचे प्राथमिक कारण दिसून येते. उतारावरून चिखल वाहून गेल्याने त्याचा फटका मोठ्या परिसराला बसला, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवले. पर्यावरण आणि भूगोल अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, की पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मातीचा थर वाहून जाणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. केरळमधील दुर्घटनेमध्ये तेच दिसून येते. ही दुर्घटना घडण्यामागे मानवी हस्तक्षेपासारखे काही घटक आहेत का, याचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागेल. केरळमधील भूस्खलनाची दुर्घटना डोंगराळ भागात घडली आहे. त्या भागात जांभा दगड असल्याने त्यातून पाणी झिरपते. पाऊस प्रचंड झाल्यास दगडाखाली असलेला मातीचा भुसभुशीत थर वाहून जाऊ शकतो. वायनाड येथील भूस्खलन अशा प्रकारचे असल्याचे दिसते. ही दुर्घटना आपल्याकडे घडलेल्या तळीये, माळीण येथील दुर्घटनांसारखीच आहे. अन्य घटक कारणीभूत आहेत का, या बाबत सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ भूशास्त्रज्ञ डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




