“कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे स्लोगन होतं. त्या भरवशावर सत्ता मिळवली. शेष नागावर पृथ्वी अशी अख्यायिका आहे तसं आयत्या बिळावर नागोबा अशी स्थिती आहे. महाराष्ट्र कुठे आहे आज? महाराष्ट्रात शेतकरी, बरोजगारी, गुंतवणूक कुठे आहे? केवळ घोषणा, लोकांची फसवणूक यासाठी महाराष्ट्राची जगभर चर्चा आहे. ड्रग्समध्ये महाराष्ट्र खूप पुढे गेलाय, चहापानाला का जायचं? हा प्रश्न आहे” अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो, शासनाकडून केवळ दोन ओळींची लाईन म्हटली जाते. यात कुठेही, कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करु नये. का करु नये? हा घातपात आहे की अपघात आहे? या संदर्भात महाराष्ट्रासह देशभर चर्चा आहे. सरकारची भूमिका संदिग्ध आहे. महाराष्ट्र बघतोय, अशावेळी आम्ही का जायचं” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
“भारत-अमेरिका ट्रेड डीलनंतर काय परिणाम होणार? यावर मुख्यमंत्र्यांकडून काही आलं का? मक्यावर काय परिणाम होणार? तूरडाळ या पिकांची कबंरडं मोडलं जाणार. महाराष्ट्रात MSP ने कुठेही शेतकऱ्यांचा माल विकत घेतला जात नाही. सीसीआयए कापूस खरेदी निम्म्यावर आली. जाचक अटी घातल्या. 40 ते 45 टक्के कापूस शेतकऱ्याच्या घरात पडून आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली. हे सरकार कुंभकर्ण आहे. शेतकऱ्यांबद्दल अजिबात कणव नाही” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
यवतमाळ, मराठवाड्यात एका महिन्यात किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या?
“सोयाबीनला 4 हजार रुपयांपलीकडे एक रुपया मिळाला नाही. सरकारला चॅलेंज आहे कुठेही MSP ने मक्याची खरेदी झाली का?. शासनाने खरेदी केली नाही. व्यापाऱ्यांनी सुद्धा जिवंतपणी मरण यातना देण्यासासारखा निर्णय घेतला. यवतमाळ जिल्ह्यात एका महिन्यात 22 शेतकऱ्यांनी, मराठवाड्यात एका महिन्यात 76 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी आहे. दुर्देवाने महाराष्ट्रात एका शेतकऱ्याला सावकाराच्या कर्जामुळे किडनी विकावी लागते. शेतकरी लुटीचं काम सुरु आहे” अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
[embedded content] 1500 च्या ठिकाणी 3000 का देत नाही?
“लाडक्या बहिणींमुळे कर्जबाजारी झालो असं भास्करराव बोलले.त्यामुळे बाकी योजनांना कात्री लावली. डावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटींचे करार केलेत. आम्ही या संदर्भात व्हाइट पेपरची मागणी करणार आहोत, काढलाचा पाहिजेच. महाराष्ट्र पुढे चित्र आलं पाहिजे. एवढं जर होत असेल कर महाराष्ट्रातील बहिणींना 1500 च्या ठिकाणी 3000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे. हे सर्व ढोंग आहे. महाराष्ट्र लुटला जातोय. प्रचंड भ्रष्टाचार आहे. कमिशनखोरी सरळसरळ 20 ते 25 टक्क्यावर जात आहे. महाराष्ट्रात तर सर्व कामं मॅनेज करुन दिली जात आहेत. कुठल्याही कामात स्पर्धा होत नाहीय. सर्व कमिशन घेतली की कामं वाटली जातात” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
शहर
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- बीड: परळीत मोकाट कुत्र्यांचा थरार! अवघ्या ४८ तासांत २३ जणांना लचके तोडले, नागरिकांत दहशत!
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!























Subscribe to my channel



