
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्कूल बस आणि कारला भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमधील दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी चुकीच्या दिशेने धावणाऱ्या स्कूल बस कारने जोरदार धडक दिली. क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल विहारसमोर हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्कूल बसमध्ये एकही विद्यार्थी नव्हता. बसमध्ये फक्त चालकच होता. या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ट्वीट करत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
|
Monsoon Session 2023 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून |
मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली. याआधी सोमवारी रात्री उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्येही अपघात झाला होता. याठिकाणी टेम्पो आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर अपघातात 5 जण जखमी झाले.
दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये आज प्रवासी बसला भीषण अपघात झाला. ही बस पुलावरुन थेट कालव्यात कोसळली. या अपघातामध्ये बसमधील सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




