
New Delhi : कृषी आणि कृषिपूरक क्षेत्रांसाठी क अर्थसंकल्पात एक लाख ६२ हजार ६७१ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ती ७.१२ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी एक लाख ५१ हजार ७५३ कोटींची तरतूद शेतीसाठी केली होती. ग्रामीण भागातील उत्पन्न वाढविणे आणि पारंपरिक शेतीपलीकडील रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पशुधन, मत्स्य व्यवसाय आणि उच्च मूल्य कृषी क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रमांची घोषणा केली आहे.
शेतीउत्पन्नात पशुधनाचा वाटा १६ टक्के असल्याचा उल्लेख करून सीतारामन यांनी गरीब आणि अल्पभूधारक कुटुंबांसाठी कर्ज आधारित भांडवली अनुदान योजनेचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला. ही योजना खासगी क्षेत्रातील पशुवैद्यकीय आणि खासगी महाविद्यालये, पशुवैद्यकीय रुग्णालये, निदान प्रयोगशाळा आणि प्रजनन सुविधांच्या स्थापनेस साह्यभूत ठरेल. या योजनेमुळे ग्रामीण भागात २० हजारांपेक्षा अधिक पशुवैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता होऊ शकेल. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी पाचशे जलाशये आणि अमृत सरोवरांचा पाचशे जलाशये आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास करून किनारी भागांमधील मूल्य साखळी मजबूत केली जाईल. यामुळे स्टार्टअप्स, महिला बचतगट आणि मत्स्य शेतकरी उत्पादक संघटनांद्वारे बाजारपेठेशी जोडणी सहज शक्य होऊ शकेल. विशेष आर्थिक क्षेत्र आणि खोल समुद्रातील मासेमारीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अशी मस्त्य उत्पादने परदेशी बंदरावर उतरवल्यास, ती निर्यात मानली जाईल. मासेमारीची वाहतूक व हस्तांतरणादरम्यान गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना केल्या जातील, भारतीय मच्छिमारांना देशाच्या प्रादेशिक जलक्षेत्राबाहेरील सागरी संसाधनांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्यास मदत करणे हा मुख्य उद्देश आहे. मागील आर्थिक वर्षात निर्यात केलेल्या 'सी-फूड' उत्पादनांच्या 'एफओबी' मूल्याच्या विशिष्ट आयातीवरील शुल्क-मुक्त आयातीची मूल्यमर्यादा वाढविणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.
|
|
नारळ प्रोत्साहन योजना
किनारी भागातील शेतकऱ्यांसाठी सीतारामन यांनी जुन्या आणि कमी उत्पादन देणाऱ्या झाडांएवजी नवीन जातींची लागवड करण्याच्या उद्देशाने नारळ प्रोत्साहन योजनेचा प्रस्ताव मांडला. नारळाचे उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये एक कोटी उत्पादक शेतकऱ्यांसह ३० कोटी लोक त्यांच्या उपजीविकेसाठी नारळावर अवलंबून आहेत; तसेच भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारतीय काजू आणि कोकोसाठीच्या एका विशेष कार्यक्रमाचा घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या पिकांबाबत २०३० पर्यंत देशाला उत्पादन आणि प्रक्रियेमध्ये आत्मनिर्भर बनविणे, निर्यातीतील स्पर्धात्मकता वाढवणे आणि त्यांना जागतिक स्तरावरील उच्च ब्रँडसमध्ये परावर्तित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
देशी चंदनाच्या लागवडीला चालना
चंदनाची लागवड व उत्पादन काढणीनंतरच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी राज्यांसोबत भागीदारी करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. ज्यामुळे
भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडले गेलेल्या चंदन परिसंस्थेला गतवैभव परत मिळू शकेल. डोंगराळ भागातील फळबागांचे पुनरुज्जीवन करण्याची घोषणा करतानाच, बदाम, अक्रोड, पाइन नट्सच्या लागवडीच्या विस्तारासाठी अर्थसंकल्पात विशेष कार्यक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून डोंगराळ भागातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पशुधन उत्पादक संघटनांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज-संलग्न अनुदानाचा प्रस्ताव
कृषी स्टॅकचे एकत्रीकरण करण्यासाठी 'भारत विस्तार' हे बहुभाषिक 'एआय' टूल आणणार
महिला समुदायांसाठी 'शी मार्ट्स' ही किरकोळ विक्री केंद्रे स्थापन करणार
तेंदू पत्त्याच्या उद्गमस्थानी कर संकलन (टीसीएस) दोन टक्क्यांपर्यंत कमी करणार
काजू, कोको उत्पादनात देशाला २०३० पर्यंत आत्मनिर्भर बनविणार
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
- महाराष्ट्र: शरद पवार गटाला खिंडार! तीन आजी-माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!




























Subscribe to my channel





Apply now and unlock exclusive affiliate rewards!