उत्तराखंडमध्ये मुंबईच्या पर्यटकांवर स्थानिक व्हेंडर्सकडून भीषण हल्ला; पोलिसांच्या समोरच दगडफेक आणि दरीत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल उत्तराखंड या देवभूमीत पर्यटनासाठी गेलेल्या मुंबईतील एका पर्यटकासोबत आणि त्यांच्या वृद्ध वडिलांसोबत अत्यंत धक्कादायक आणि थरकाप
उडवणारी घटना घडली आहे.
मसूरी-कनाताल महामार्गावर स्थानिक व्यावसायिक आणि व्हेंडर्सनी मुंबईच्या पर्यटकांना घेरून त्यांच्यावर पोलिसांसमोरच जोरदार दगडफेक केली. एवढेच नव्हे तर वाद विकोपाला गेल्यानंतर पर्यटकांना थेट खोल दरीत ढकलून देण्याचाही जीवघेणा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून इंटरनेटवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पैशांच्या वादातून थेट दगडफेक:मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एक पर्यटक आपल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या वडिलांसह उत्तराखंडमधील प्रसिद्ध मसुरी–कनाताल महामार्गावरील सुरकांडा माता मंदिर परिसरात पर्यटनासाठी गेले होते. या परिसरात एका स्थानिक व्हेंडरकडून (असे सांगितले जात आहे की हा व्हेंडर कथितरित्या 'क्लब महिंद्रा कनाताल'शी संबंधित आहे) पर्यटकांकडून जबरदस्तीने अवाजवी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला. पर्यटकांनी या सक्तीच्या वसुलीला आणि गुंडगिरीला स्पष्ट विरोध केला. या विरोधानंतर स्थानिक व्यावसायिक आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून पर्यटकांना घेरले. वाद इतका वाढला की स्थानिक गुंडांनी पर्यटकांच्या दिशेने थेट मोठे दगड फेकण्यास सुरुवात केली. त्यांना बेदम मारहाण करत रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत ढकलून देण्याचाही प्रयत्न केला गेला. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; मूकदर्शक बनून पाहिली मारहाण:व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर्वात संतापजनक बाब समोर आली आहे ती म्हणजे स्थानिक पोलिसांची हतबलता किंवा निष्क्रीयता. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, ज्या पर्यटकावर दगडाने हल्ला झाला तो रक्तबंबाळ किंवा घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांकडे हात जोडून मदतीची याचना करत आहे. "सर, बघा हे लोक माझ्यावर दगड फेकत आहेत," असे तो पोलिसांना सांगत आहे.
दगड फेकणारे आणि हुज्जत घालणारे स्थानिक गुंड थेट पोलिसांच्या समोरच उभे राहून पुन्हा धमकावत आहेत, तरी देखील उपस्थित पोलिसांनी त्या गुंडांवर कोणतीही कडक ॲक्शन घेतली नाही किंवा त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न:पोलिसांसमोरच घडलेल्या या गुंडगिरीमुळे
उत्तराखंडमधील स्थानिक प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या देशभरातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
"जर पोलिसांसमोरच पर्यटकांवर जीवघेणे हल्ले होणार असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे?" असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नेटकऱ्यांनी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची आणि पर्यटकांना सुरक्षा देण्याची मागणी उत्तराखंड
सरकारकडे लावून धरली आहे.
शहर
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
महाराष्ट्र
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सांगली: गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीतून पत्ता कट
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!

























Subscribe to my channel




