
नवी मुंबई: महापालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दुसरी गर्भवती महिला अद्याप गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समितीचीनियुक्ती करण्यात आली असून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मृत महिलेची ओळख सोनम डोंगरे अशी असून त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांच्यासोबत उपचारासाठी दाखल झालेल्या रिचा मिश्रा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोन्ही महिलांना उपचारादरम्यान इंजेक्शन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. योग्य उपचार न मिळाल्याने आणि वैद्यकीय हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला असून संबंधित
जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत नवी मुंबई महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारी, उपचार प्रक्रिया, औषधे व इंजेक्शन देण्याची पद्धत तसेच संपूर्ण उपचार नोंदींची तपासणी केली जाणार आहे.समितीला १५ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, रिचा मिश्रा यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याने त्यांच्यावर डॉक्टरांचे विशेष लक्ष असून आवश्यक ते सर्व उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. चौकशी अहवालानंतर या प्रकरणात पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- पुणे: पंतप्रधान मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा! मनसे नेते अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांची घणाघाती टीका
महाराष्ट्र
- पुणे: जुन्नर तालुक्यातून खळबळजनक बातमी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला आभाटेक जंगलात, परिसरात उडाली मोठी दहशत व शोककळा
- पुणे: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कसूर चालणार नाही; राज्य शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नियमावली जाहीर, दिले ११ महत्त्वाचे निर्देश
- पुणे: भिंतीवर कशाला, मी माझ्या कपाळावरच नरेंद्र मोदींचा फोटो चिटकवून फिरतो; भाजप-मनसे फोटो राजकारणावर संदीप देशपांडे यांचे जोरदार आव्हान
- जालना: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला! मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात उद्या जालना, बीड, परभणी आणि लातूर कडकडीत बंद; काय सुरू आणि काय राहणार बंद?
गुन्हा
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: पूर येताच सर्वात पहिली मदत भारताकडून आली; नेपाळच्या पंतप्रधानांचे संसदेत भारत आणि चीनचे मानले आभार; महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
- उत्तराखंड: पूर आलेली नदी पार करताना हातातून निसटली चिमुकली, लेकीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी अन् दोघींचाही मृत्यू
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात


























Subscribe to my channel




