मुंबई: पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार घसरण पाहायला मिळाली. १८ मे रोजी बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'बीएसई सेन्सेक्स' (BSE Sensex) १००० हून अधिक अंकांनी कोसळला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा 'निफ्टी५०' (Nifty 50) ३०० हून अधिक अंकांनी खाली आला. या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले असून रुपयानेही डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतचा ऐतिहासिक नीचांक गाठला आहे.
गुंतवणूकदारांचे ७ लाख कोटी रुपये स्वाहा
सोमवारी सकाळी ९.५० वाजता मुंबई शेअर बाजार १,०१०.६४ अंक म्हणजेच १.३४ टक्क्यांच्या घसरणीसह ७४,२२७.३५ अंकांवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, निफ्टी निर्देशांक ३०३.२५ अंकांनी घसरून २३,३४०.२५ अंकांवर खाली आला. या चौफेर विक्रीमुळे बीएसईवर (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप (बाजार भांडवल) थेट ७ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ४५४ लाख कोटी रुपयांवर आले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे बाजारात भूकंप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराण संदर्भात एक मोठी चेतावणी दिली आहे. "इराणसाठी वेळ संपत चालली आहे आणि त्यांनी लवकरच निर्णय घेतला नाही, तर त्यांच्याकडे काहीही उरणार नाही," असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या धमकीमुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली. ब्रेंट क्रूड (Brent Crude) १.८४ टक्क्यांनी वाढून १०७.३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले, तर इंडियन बास्केट देखील ०.२४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १०९.३ डॉलरवर गेले.
'या' शेअर्समध्ये झाली मोठी घसरण
सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समधील पॉवर ग्रिडच्या शेअरमध्ये सर्वाधिक ३.८१ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय टाटा स्टील, मारुती सुझुकी, टायटन, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्रा अँड महिंद्रा या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय पडझड झाली. दुसरीकडे, जागतिक पडझडीच्या काळातही इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि टीसीएस या आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली. क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी रियल्टी, निफ्टी ऑटो आणि निफ्टी मीडिया यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली.
डॉलरसमोर रुपयाची नांगी; ऐतिहासिक नीचांकावर
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. इराण युद्धाचा भडका आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे रुपयाची शंभरीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. सकाळच्या सत्रात रुपया ०.२ टक्क्यांनी घसरून ९६.१८ प्रति डॉलर या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर आला. २८ फेब्रुवारी रोजी इराणमध्ये तणाव वाढल्यापासून रुपया डॉलरच्या तुलनेत ५.५ टक्क्यांनी घसरला असून चालू वर्षात आशियाई चलनांमध्ये रुपयाची कामगिरी सर्वात खराब राहिली आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




