मुंबई: शिक्षण, आरोग्य आणि बालकांचे पोषण या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आधीच शिरावर असताना, सरकार आता जनगणनेच्या अतिरिक्त कामाचे ओझे आमच्यावर का लादत आहे? असा संतप्त प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रातील तब्बल दीड लाख अंगणवाडी सेविकांनी आगामी २०२६-२७ च्या जनगणनेच्या कामावर बहिष्कार टाकला असून हे काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
कुपोषण निर्मूलनाच्या मूळ कामावर होणार परिणाम
मुंबई उपनगरांसह महाराष्ट्राच्या अनेक दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये कुपोषणाची समस्या अजूनही गंभीर आहे. अशा परिस्थितीत बालकांना वेळेवर पोषण आहार देणे, गरोदर माता आणि बालकांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवून बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, तसेच कुपोषण निर्मूलनाच्या विविध शासकीय योजनांची तळागाळात अंमलबजावणी करणे ही अंगणवाडी सेविकांची मुख्य कर्तव्ये आहेत. मात्र, या नियमित कामांव्यतिरिक्त इतर योजनाबाह्य कामे दिल्याने मूळ उद्दिष्टाला धक्का पोहोचत असल्याची भावना सेविकांमधून व्यक्त होत आहे.
आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
या गंभीर विषयाची दखल घेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे (ICDS) आयुक्त कैलास पगार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक विशेष पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, "अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर आधीच दैनंदिन कामाचा प्रचंड ताण आहे. आहार आणि पोषणाशी संबंधित सेवा अत्यंत संवेदनशील असून त्या वेळेत मिळणे गरजेचे आहे. जर या सेवांमध्ये इतर कामांमुळे दिरंगाई झाली, तर त्याचा माता आणि बालकांच्या आरोग्यावर अत्यंत विपरीत व घातक परिणाम होऊ शकतो."
योजनाबाह्य कामांमधून मुक्ती देण्याची मागणी
आयुक्त कैलास पगार यांनी पुढे नमूद केले आहे की, अतिरिक्त आणि विना-संबंधित कामांमुळे अंगणवाडी सेविकांना त्यांच्या नियोजित कामांना योग्य न्याय देता येत नाही. त्यामुळे या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना त्यांच्या मूळ बालविकास योजनेशी संबंध नसलेल्या इतर कोणत्याही सेवांचे कामकाज, जसे की निवडणुकांचे काम, विविध सर्वेक्षणे (सर्व्हे) किंवा आता सुरू होणारे जनगणनेचे काम देण्यात येऊ नये, जेणेकरून त्यांच्यावरील अतिरिक्त ताण कमी होईल आणि त्या पूर्ण क्षमतेने बालविकासाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel





https://shorturl.fm/MXRLY