नागपूर: उपराजधानी नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाल येथील कोठीरोड परिसरात मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच जागेवर अवघ्या चार दिवसांत दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
१. संघ मुख्यालयाजवळ मध्यरात्री गोळीबार!
रविवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास महालातील कोठीरोड परिसरात गोळीबार झाला. धक्कादायक बाब म्हणजे, हे घटनास्थळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे. तीन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांच्या टोळीने परिसरात दहशत माजवत दोनदा हवेत गोळीबार (फायरिंग) केला आणि पळ काढला.
सौरभ नावाच्या फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, रवी मोहतो आणि गंगा काकडे नावाच्या गुन्हेगारांनी आपल्या साथीदारांसह परिसरात वर्चस्व व दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर अमली पदार्थ (ड्रग्ज) बाळगणे आणि विक्री करण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यातील अंतर्गत वादातूनच हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. सध्या कोतवाली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
२. MIDC मध्ये एकाच ठिकाणी चार दिवसांत दोन हत्या!
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माधवनागरी परिसरातील एकाच जागेवर चार दिवसांच्या अंतराने दोघांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
पहिली घटना: गेल्या गुरुवारी याच ठिकाणी आकाश बरडे या तरुणाची अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली होती.
दुसरी घटना: ही घटना ताजी असतानाच, रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अंकुश शेंडे या मजुराची त्याच जागेवर अगदी तशाच पद्धतीने दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली. अंकुश हा दारूच्या आहारी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे.
हे दोन्ही मृतक एकाच इसासनी भागातील रहिवासी होते आणि दोन्ही हत्येचे घटनास्थळ देखील एकच आहे. जरी पोलीस या दोन्ही हत्यांचा एकमेकांशी थेट संबंध नसल्याचे सांगत असले, तरी एकाच जागेवर चार दिवसांत दोन जणांना संपवल्यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. पोलीस दोन्ही प्रकरणांतील मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
गुन्हा
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
- पुणे: पुण्यातील गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणातील आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी; पोलिसांनी कोर्टात दिली धक्कादायक माहिती!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!
























Subscribe to my channel





https://shorturl.fm/zPQwm