अमरावती: शहरालगत असलेल्या नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीमधील (MIDC) रासायनिक कंपन्यांमुळे होणाऱ्या भीषण जल आणि वायू प्रदूषणाचा मुद्दा आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (NEERI) अधिकृत तपासणी अहवालात या परिसरातील शेतजमीन आणि भूगर्भातील पाणी कमालीचे दूषित झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. औद्योगिक रासायनिक कचऱ्यामुळे नांदगावपेठ परिसरातील सुपीक काळ्या मातीमध्ये सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या गंभीर अहवालानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून प्रदूषणाचा फटका बसलेल्या बाधित जमिनींच्या भूसंपादनाचे (Land Acquisition) आदेश जारी करण्यात आले आहेत.
काळ्या मातीचा टाहो; पिके आणि मानवी आरोग्य धोक्यात:
नांदगावपेठ एमआयडीसी परिसरातील रासायनिक सांडपाणी उघड्यावर आणि स्थानिक जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक शेतकरी करत होते. 'निरी'च्या (NEERI) शास्त्रज्ञांनी केलेल्या माती आणि पाण्याच्या रासायनिक चाचण्यांमध्ये जमिनीची सुपीकता पूर्णपणे नष्ट झाल्याचे सिद्ध झाले आहे. रासायनिक घटकांमुळे पिके करपून जात असून, उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. यासोबतच प्रदूषित हवेमुळे आणि दूषित भूगर्भातील पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचारोग आणि इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रशासनाचे भूसंपादनाचे आदेश; शेतकऱ्यांचे लक्ष भरपाईकडे:
वाढत्या जनक्षोभाची आणि 'निरी'च्या अहवालाची दखनील घेत प्रशासनाने प्रदूषणाचा थेट फटका बसलेल्या शेतजमिनी संपादित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या जमिनी आता शेतीसाठी किंवा मानवी वास्तव्यासाठी अयोग्य ठरल्या आहेत, त्या जमिनींचे रीतसर भूसंपादन करून संबंधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. मात्र, केवळ भूसंपादन करून प्रश्न सुटणार नसून दोषी रासायनिक कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि भविष्यातील प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आणि पर्यावरणप्रेमी संघटनांकडून केली जात आहे.
शहर
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
महाराष्ट्र
- बीड: परळीत मोकाट कुत्र्यांचा थरार! अवघ्या ४८ तासांत २३ जणांना लचके तोडले, नागरिकांत दहशत!
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




