पाकिस्तानच्या कर्णधाराची मागणी सूर्यकुमार यादवने केली मान्य, म्हणाला..Image Credit source: pti/instagram
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 27व्या सामन्यात भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. भारत पाकिस्तान सामना म्हंटलं रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो. या सामन्यातील प्रत्येक अपडेट असेल तिथे घेण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. कारण दोन्ही संघातील सामन्याला युद्धाचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान हे संघ फक्त मल्टी नॅशनल स्पर्धेतच भिडतात. आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने येतात. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता आणखी ताणली जाते. आता 15 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान संघ भिडणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांकडून शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या स्पर्धेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपलं म्हणणं मांडलं. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने आपलं म्हणणं मांडल्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याला उत्तर दिलं आहे.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने अभिषेक शर्मा फिट व्हावा आणि आमच्याविरुद्ध खेळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. अभिषेक शर्माची तब्यते खराब असल्याने पाकिस्तान विरुद्ध खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. असं असताना पाकिस्तान संघाच्या कर्णधाराची इच्छा पूर्ण होईल असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. सूर्यकुमार यादवच्या या सकारात्मक उत्तराने अभिषेक शर्मा या सामन्यात खेळेल अशी आशा बळावली आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘जर पाकिस्तानी संघाच्या कर्णधाराची इच्छा अभिषेक खेळावा अशी असेल तर तो नक्कीच खेळेल.’ इतकं सांगून सूर्यकुमार हसू लागला. यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर फिट असून त्याच्या खेळण्याबाबतही संकेत दिले आहेत.
#INDvPAK psk captain on Abhishek Sharma. What do you think, will he play? pic.twitter.com/Wa5DhNoaMz
— Invisible Truth (@Truthovermyth) February 14, 2026
प्लेइंग 11 मध्ये काय बदल होणार?
अभिषेक शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर संघात खेळणार असे संकेत मिळत आहे. त्यामुळे दोन खेळाडूंना बाहेर बसण्याची वेळ येणार आहे. संजू सॅमसनच्या जागी अभिषेक शर्मा उतरेल यात काही शंका नाही. तर रिंकु सिंहची बॅट काही मागच्या दोन सामन्यात चालली नव्हती. त्यामुळे त्याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर जागा घेऊ शकतो. कारण पाकिस्तानविरुद्ध फिरकीचा मारा करण्याची आवश्यकता आहे. अशा स्थितीत वॉशिंग्टन सुंदरची गरज संघाला असणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



