Sunetra Pawar : नेते अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्यातील अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे. अजितदादा राज्याचे अर्थमंत्री होते. याआधीचा अर्थसंकल्प अजितदादांनीच सभागृहात मांडला होता. परंतु अजितदादा अनंताच्या प्रवासाला निघून गेल्याने यावेळचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत. अजितदादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांचे यावेळचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. याच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार आपले पती आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्याविषयी बोलल्या आहेत. त्यांनी नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं, असं म्हणत अजितदादांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं.
अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर
यावेळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी बोलताना, जनतेने पुन्हा एकदा महायुतीला सत्ता दिली. अजितदादांनी एकूण 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आदरणीय दादा यांनी पहिला अर्थसंकल्प 2011 साली सादर केला होता. त्यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता तो एक लाख 44 हजार 783 कोटी रुपयांचा होता. तर मागच्या वर्षी म्हणजेच 2025 साली अजिदादांच्या कारकिर्दीतील अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प 7 लाख 20 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. ही फक्त आकड्यांची वाढ नाही तर महाराष्ट्राला सर्वांगीन विकासाकडे नेण्याचा प्रयत्न आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच..
तसेच, विकासाच्या यात्रेत अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीशी आणि पारदर्शकतेशी कधीही तडजोड केली नाही. विकास आणि शिस्त राखत महाराष्ट्राला सक्षम करण्याचं काम अजितदादांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने अजिदादांनी यावेळच्या अर्थसंकल्पाला जोरदार सुरुवात केली होती. मात्र यंदाचा अर्थसंकल्प अजितदादांच्या कारकिर्दीतील 12 वा अर्थसंकल्प ठरला असता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि अजितदादा अचानक आपल्याला सोडून गेले, असं दु:ख त्यांनी व्यक्त केलं.
अर्थव्यवस्था वाढवणे हा अजितदादांचा ध्यास
अजितदादांचे निधन होण्यापूर्वीच त्यांनी तसेच त्यांच्या टीमने अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यापर्यंत नेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत साध्य करण्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढवणे हा अजितदादांचा ध्यास होता. त्यासाठी अजितदादा सातत्याने प्रयत्नशील होते. आर्थिक शिस्त आणि विकासाचा समतोल हेच त्यांच्या कामाचे सूत्र होते, असेह सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
महायुती सरकार सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी टीका करण्यात आली. परंतु अजितदादांनी योग्य आर्थिक नियोजन करून या योजनेसाठी निधीची कमतरता कधीच भासू दिली नाही. ही योजने त्यांनी यशस्वीपणे सुरू ठेवली. माझे हे पहिलेच अधिवेशन आहे. हे अधिवेशन चांगल्या प्रकारे, नियोजनबद्ध चालेल अशी मला खात्री आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
[embedded content]
शहर
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
- पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
महाराष्ट्र
- मुंबई: 'समाजाला अशा धक्क्यांची गरज असतेच'; बीएमसी प्रमुख अश्विनी भिडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडेंच्या कामगिरीचे केले कौतुक
- मुंबई: महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या बेसमेंटमध्ये भीषण आग; ऊपरी मजल्यांवरील नागरिकांची तातडीने सुटका
- पुणे: कर्ज घेऊन शिक्षण पूर्ण केले, तरी नोकरीची शाश्वती नाही, ही आजच्या व्यवस्थेची शोकांतिका; हर्षवर्धन सपकाळ
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू


























Subscribe to my channel




