
Solapur : पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई व सोलापूरच्या आयकर अधिकाऱ्यांनी सोलापुरातील सात जणांच्या घरी व व्यावसायाच्या ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. बुधवारी (ता. १९) सकाळी सहा वाजता त्या व्यावसायिकांच्या व्यवहारांची तपासणी सुरु झाली. तब्बल १०५ तासांनंतर म्हणजेच रविवारी (ता. २३) रात्री नऊच्या सुमारास आयकर अधिकाऱ्यांची चौकशी थांबली. त्या ठिकाणचे पंचनामे आयकर अधिकारी रवाना झाले.
आयकर विभागाच्या माहितीनुसार सोलापुरातील आपटे ज्वेलर्स, त्यांचे व्यावसायिक भागीदार कोळी व वेणेगुरकर, दुसरे सराफ व्यापारी नारायणपेठकर, बांधकाम व्यावसायिक समीर गांधी, 'हेरिटेज'चे मनोज शहा व अॅड. उमेश मराठे यांच्या मागील सहा वर्षांच्या व्यवहाराची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. या तपासणीत आयकर अधिकाऱ्यांनी संबंधितांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या नावावरील प्रॉपर्टी, अंगावरील दागिने, घरातील, कपाटातील व बँका, पतसंस्थांच्या लॉकरमधील दागिन्यांची माहिती घेतली. त्यांचे मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबमधील चॅट, माहिती, बॅकअप डेटा मिळविला.
|
Pune : राज्यातील पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली;राज्यभर आता २२ फेब्रुवारीला होणार परीक्षा |
दैनंदिन हिशेबाच्या नोंदवह्या, कच्च्या डायरी, वार्षिक उत्पन्न व सहा वर्षांत कमावलेली संपत्ती, रोखीने केलेले व्यवहार, याची कागदपत्रे ताब्यात घेतली. शेवटी जबाब घेऊन जप्त वस्तू, कागदपत्रांचा पंचसक्षम पंचनामा झाला. त्यानंतर आयकर अधिकारी सोलापूरहून त्यांच्या त्यांच्या विभागीय कार्यालयात रवाना झाले. या संपूर्ण तपासाचे अधिकाऱ्यांनी व्हिडिओ शुटिंग केले आहे. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांची दुकाने, त्यांच्या आस्थापना उद्यापासून (सोमवारी) नेहमीप्रमाणे खुली रहातील.
उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती, पण...
सोलापूर शहरातील सात जणांवर आयकरच्या धाडी पडल्या. एकूण २४ ठिकाणी आयकर अधिकारी चौकशी करीत होते. पाच दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांना बरीच माहिती, कागदपत्रे मिळाली आहेत. भागिदारीत व्यवसाय करणाऱ्यांकडे आलेला पैसा, संपत्ती, त्याचा स्त्रोत, याचाही तपास झाला. सराफ व्यापाऱ्यांकडील दागिने, त्याचा हिशेब, व्याजाने पैसे देऊन जमा झालेले दागिने, सोन्याची बिस्कीटे, किलोने सापडलेले दागिने, त्याच्या नोंदी, खरेदीदस्त व साठीखताचे दस्त देखील ताब्यात घेतले आहेत. आता उपलब्ध कागदपत्रे व संबंधित व्यावसायिकांनी जबाबात दिलेली माहिती, याची पडताळणी होईल. त्यानंतर नेमका कोणी किती टॅक्स चुकविला किंवा नाही, हे स्पष्ट होईल असे आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले.
'कोडवर्ड'मधील आकड्यांची जुळवाजुळव
आयकर अधिकाऱ्यांना काही ठिकाणी सापडलेल्या कच्च्या वह्या व मोबाईलमध्ये 'कोडवर्ड'मधील आकडे आढळले. काही मेसेजही तसेच होते. एकक, दशकामध्ये आढळलेले ते आकडे लाखात की कोटींचे आहेत, याचा अभ्यास प्राप्त झालेली माहिती व कागदपत्रांवरून केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!



























Subscribe to my channel




