नवी मुंबई: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते यावरून झालेल्या वादात संतप्त झालेल्या तरुणाने जन्मदात्या आईची हत्या केली. नवी मुंबईतील जुहूगावात ही संतापजनक घटना घडली. जमिनीवर डोकं आपटून आरोपीने आईची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 'आई घरात मुलगा आणि सुनेकडे लक्ष देण्याऐवजी मुलीकडे जास्त लक्ष देत असल्याच्या रागातून मुलाने हे भयंकर कृत्य केले. रविवारी रात्रीच्या सुमारास आई आणि मुलामध्ये याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने आईला ढकलून दिलं नंतर जमिनीवर डोकं आपटून तिची हत्या केली. मंदा कदम असं हत्या झालेल्या महिलेचे नाव होते. या घटनेनंतर नवी मुंबई पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
धुळ्याच्या साक्री तालुक्यातील वाकी गावात पतीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपीला अटक केली. या हत्येचे नेमके कारण काय याचा पोलिस तपास करत आहेत. चारित्र्याच्या संशयावरून आरोपीने पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वाकी गावच्या शिवारातील शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. हत्या झालेल्या महिलेचे नाव सुनंदा गोटू चौधरी (वय ४० वर्षे) असे होते. पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत संशयित आरोपी पती गोटू गनसाराम चौधरी (वय ४६ वर्षे) याला अटक केली. चौकशीत त्याने बायकोच्या हत्येची कबुली दिली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- पुणे: नगरसेवक झाल्यानंतर सगळेच जण अचानक बिल्डर का होतात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे लोकप्रतिनिधींना खडे बोल व महत्त्वाचे सल्ले
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन
महाराष्ट्र
- सांगली: राजकारणात कदम-लाड संघर्षाची नवी ठिणगी; किरण लाड हेच जी. डी. बापूंचे खरे वारसदार असल्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
- सातारा: कराडकरांची तहान भागवण्यासाठी शासन व प्रशासन कामाला; दुष्काळ निवारणासाठी मिळणार ८ कोटी २७ लाखांची भरीव मदत आणि १० टक्के पाणीकपातीचा निर्णय
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
- चंद्रपुर: वाघाचा थरार अन् उडाली दहशत! एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकरी जागीच ठार, तर एक गुराखी गंभीर जखमी
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान




























Subscribe to my channel




