अहिल्यानगर: एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर देवस्थानच्या परिसरामध्ये हा प्रकार घडल्यामुळे संपूर्ण परिसरात आणि भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. देवस्थानातील बाथरूममध्ये एका तथाकथित साधूने महिला सहकाऱ्यासोबत केलेले नको ते कृत्य उघडकीस आले असून, हा साधू बाथरूममध्ये एका महिलेसोबत नग्न अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे धार्मिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे श्री चैतन्य कानिफनाथ देवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या पवित्र देवस्थानच्या परिसरात असणाऱ्या बाथरूममध्ये एक तथाकथित साधू आणि महिला संशयास्पद व नग्न अवस्थेत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिकांनी आणि भाविकांनी घटनास्थळी गर्दी केली. विशेष म्हणजे, मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी या घटनेचा व्हिडिओ थेट समाज माध्यमांवर व प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे हा प्रकार राज्यभर वाऱ्यासारखा पसरला.
दरम्यान, हा साधू आणि ती महिला मर्जीने एकत्र गेले होते की त्या महिलेला बळजबरीने बाथरूममध्ये नेण्यात आले होते, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एवढी मोठी आणि संतापजनक घटना मंदिराच्या परिसरात घडूनही संबंधित पोलीस ठाण्यात याप्रकरणी अद्याप कोणताही अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही तसेच कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. कारवाई टाळल्यामुळे ग्रामस्थांमधून आणि भाविकांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या गंभीर प्रकारावरून मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी थेट देवस्थान ट्रस्टींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मंदिराच्या पवित्र परिसरात असे प्रकार सुरू असताना देवस्थानचे ट्रस्टी मूग गिळून गप्प बसले आहेत आणि तोंडाला पट्टी लावून बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी ट्रस्टींवर व संबंधित साधूवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी लावून धरली आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर कायदेशीर पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


