पुण्यातील हडपसर परिसरातील महंमदवाडी भागात कौटुंबिक वादातून एका ४३ वर्षीय व्यक्तीची दगडाने डोक्यात वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाच्याचा संसार विस्कटल्याच्या आणि मोडल्याच्या प्रचंड रोषातून आरोपीने हे टोकाचे कृत्य केले आहे. विशेष म्हणजे, या जघन्य गुन्ह्यानंतर आरोपी स्वतः रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणि कपड्यांमध्ये थेट काळेपडळ पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
-
कौटुंबिक वाद आणि पार्श्वभूमी: मयत सैफन बाबूलाल सय्यद (वय ४३, रा. राजीव गांधी कॉलनी, तरवडे वस्ती, हडपसर, पुणे) असे खून झालेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. सैफन यांची मुलगी सना हिचा विवाह आरोपी हनुमंत उर्फ सागर सुग्रीव कांबळे (वय २५, रा. आशीर्वाद पार्क, महंमदवाडी, पुणे) याच्या भाच्यासोबत झाला होता. काही काмяपूर्वी आरोपीच्या भाचाचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर सना आणि तिच्या सासरच्या मंडळींमध्ये सतत खटके उडत होते आणि ती सासरी व्यवस्थित राहत नव्हती.
-
टेकडीवर झालेला वाद आणि हल्ला: घटनेच्या दिवशी पुन्हा याच कारणावरून सासरच्या मंडळींसोबत वाद झाल्यानंतर सना रागाने घराबाहेर निघून गेली. तिचा शोध घेण्यासाठी तिचे वडील सैफन सय्यद आणि आरोपी हनुमंत कांबळे हे दोघे महंमदवाडी परिसरातील लक्ष्मी पार्कजवळ असलेल्या डोंगराळ भागात गेले होते. तिथे एका सिमेंटच्या पाण्याच्या टाकीजवळ सनावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाशी झाली. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात आरोपी हनुमंतने जवळच पडलेला एक भलामोठा दगड उचलून सैफन यांच्या डोक्यात घातला. या गंभीर व वर्मी घावामुळे सैफन सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी केली तत्काळ अटक:
-
खून केल्यानंतर आरोपी हनुमंत कांबळे हा स्वतःच्या अंगावर रक्ताचे डाग आणि गळ्यावर जखम असतानाच रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चालत काळेपडळ पोलीस ठाण्यात पोहोचला.
-
ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस अंमलदाराने विचारणा केली असता, "मी सैफन सय्यदला मारले आहे," असे त्याने सांगितले. या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता सैफन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




