पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!

पुणे: पुण्यातील रविवार पेठेतून पाळीव श्वानावरील अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघं तीन वर्ष वय असलेल्या 'डॅनी' नावाच्या पामेरियन प्रजातीच्या पाळीव श्वानाला त्याच्या मालकाने मारहाण करून गंभीर जखमी केले. या श्वानाला खाली असलेल्या पत्र्यावर फेकून देण्यासह हाताने आणि बेल्टने मारहाण करून भिंतीवर आपटल्याची तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात श्वानमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गणेश लक्ष्मण परदेशी (वय ५२, रा. राजधानी प्लाझा बिल्डिंग, धोबी तालीमसमोर, रविवार पेठ, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या श्वानमालकाचे नाव आहे. या प्रकरणी एका ६८ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. खडक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, ९ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत हा प्रकार घडलाय. आरोपी गणेश परदेशी याच्याकडे 'डॅनी' नावाचा अंदाजे तीन वर्षांचा पामेरियन प्रजातीचा पाळीव श्वान आहे. या श्वानाला आरोपीने खाली असलेल्या पत्र्यावर फेकून दिल्याने तो गंभीर जखमी झाला. इतकेच नव्हे, तर यापूर्वीदेखील त्याने श्वानाला हाताने आणि बेल्टने मारहाण केली होती. तसेच त्याला भिंतीवर आपटून क्रूर वागणूक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


ज्येष्ठ महिलेने तक्रार दिल्यानंतर खडक पोलिसांनी श्वानमालक गणेश परदेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढोणे करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *