मुंबई: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या, नादुरुस्त तसेच स्क्रॅप झालेल्या रिक्षांविरोधात राज्य सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. नियमबाह्य पद्धतीने आणि विनापरवाना रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर धोका ठरत आहेत. अशा अनधिकृत रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होताना त्या कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत, अशा स्पष्ट शब्दांत तडाखेबंद निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. स्क्रॅप रिक्षांविरोधात येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश त्यांनी सुनावले आहेत.
राज्यात स्क्रॅप घोषित झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा अद्यापही अवैध प्रवासी वाहतुकीसाठी सर्रास वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील परिवहन आयुक्त कार्यालयात एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी युनियनचे नेते शशांक राव तसेच राज्यभरातील विविध रिक्षा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवाशांची सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता
बैठकीत बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, सर्वसामान्य प्रवाशांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य, विनापरवाना आणि धोकादायक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास मुभा दिली जाणार नाही. ज्या रिक्षांचा वापर पूर्णपणे थांबवणे आवश्यक आहे किंवा ज्या स्क्रॅप घोषित करण्यात आल्या आहेत, अशा रिक्षांचा पुन्हा गैरवापर करणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी करणे किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांची ने-आण करणे यावर कडक नजर ठेवण्यात यावी. अशा सर्व संशयित वाहनांची विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
संबंधित नियमबाह्य वाहनांवर नियमानुसार तातडीने दंडात्मक कारवाई करण्यासोबतच जप्तीची कठोर पावले उचलावीत, असे आदेशही त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (RTO) आपापल्या कार्यक्षेत्रात ही विशेष तपासणी मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवावी आणि येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत स्क्रॅप रिक्षांविरोधातील कारवाईचा सविस्तर अहवाल व आढावा सादर करावा, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
या बैठकीदरम्यान रिक्षा-टॅक्सी चालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अनधिकृत आणि नियमबाह्य वाहनांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसायाची आणि प्रामाणिक चालकांची प्रतिमा खराब होत असल्याचे सांगत, केवळ अधिकृत आणि सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळावी, अशी भूमिका यावेळी सर्वानुमते मांडण्यात आली.
शहर
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
- अहिल्यानगर: लाखोंचा गल्ला...! प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाचे छापे; रात्रभर सुरु होती चौकशी...
- पुणे: छतावरून गॅलरीत शिरून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वानवडी पोलिसांकडून ९ महिन्यांनंतर ५ जणांना बेड्या, ७.५ लाखांचे सोने जप्त!
महाराष्ट्र
- पुणे: पद हवंय, आधी कामाचं रिपोर्ट कार्ड दाखवा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली पुण्यातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची कानउघडणी!
- मुंबई: दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा! दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकृत परवानगी!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या समर्थनासाठी मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार!
गुन्हा
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर


























Subscribe to my channel




