गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले होते. मात्र आता निवडणुका संपल्यानंतरही पक्षांतर होत असल्याचे समोर आले आहे. आज शिवसेनेत जोरदार इनकमिंग पहायला मिळाले. नांदेडमधील एका माजी आमदारासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्येही विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शंकर अण्णा धोंडगे यांचा शिवसेनेत प्रवेश
आज नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी भगवा झेंडा हाती घेत आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह दत्ता आनंदराव पवार, नीलमताई खेमनर, शिवराज धोंडगे, गोविंदराव भवर, मनोहर पटवारी, लक्ष्मणराव वंजे, अनिल फंड, बबनराव गवारे, मंचकराव बचाटे, दिलीप धोंडगे, भैय्यासाहेब पाटील, मारुती जाधव, अनिल यादव आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
📍 मुंबई |#नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी भगवा झेंडा हाती घेत आज आपल्या असंख्य समर्थकांसह #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी… pic.twitter.com/Mtq1Ecv6VP
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2026
ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे हे आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम करणारे नेतृत्व आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी उभी केलेली संघटनात्मक ताकद मोठी आहे. अशा अनुभवी आणि लढाऊ नेतृत्वामुळे शिवसेनेची शेतकऱ्यांसंदर्भातील भूमिका आणखी मजबूत होईल असे विधान यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले.
छत्रपती संभाजीनगरमध्येही शिवसेनेत जोरदार इनकमिंग
छत्रपती संभाजीनगरमध्येही शिवसेनेत जोरदार इनकमिंग पहायला मिळाली. राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, उपसचिव आणि पैठणमधील रेणुका साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब निर्मळ, पंचायत समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश डूमाले, माजी नगराध्यक्ष जतसिंह परदेशी अशोक जाधव, दत्तात्रय फसाटे, अप्पासाहेब मिसाळ, फिरोज पठाण, अन्सर सय्यद आणि त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
त्याचबरोबर चौका गावचे माजी उपसरपंच अशोक वाघ, पुंडलिक पवार, शीतल लडके, शंकर बोंगाणे, लहानु वाघ, प्रमोद पडूक, राधाकिशन पडूक, छावनाथ घोडगे, शामदास पठाडे तसेच वैजापूर तालुक्यातील सत्यजीत सोमवंशी, ऋतुराज सोमवंशी, सतीश शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




