छत्रपती संभाजीनगरमध्ये: अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू तस्करीचा एक अत्यंत भीषण आणि रक्तरंजित चेहरा समोर आला आहे.
गंगापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा (बाभुळगाव) परिसरातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांवर वाळू तस्करांच्या टोळीने केवळ बेदम मारहाणच केली नाही, तर त्यांच्यावर थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे.
या जीवघेण्या हल्ल्यात शेतकरी बंधू अंधाराचा फायदा घेऊन पळाल्याने बालंबाल बचावले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकं काय घडलं?बाभुळगावगंगा येथील स्थानिक शेतकरी जालिंदर सोपान कुंजीर यांची गोदावरी नदीपात्राजवळ शेतजमीन आणि विहीर आहे.
शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास कुंजीर हे आपल्या शेतातील विहिरीवर कृषी पंप (विद्युत मोटार) सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर आणि मशीनचा मोठा आवाज येत असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी नदीपात्राच्या दिशेने जाऊन पाहिले असता, तेथे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. शेतकऱ्यांनी या अवैध वाळू उपशाला विरोध करत आवाज दिला असता, तिथे उपस्थित असलेल्या वाळू माफियांनी त्यांना घेरले.
आरोपींनी कुंजीर यांना पकडून अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आणि लाकडी दांडके, काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर तस्करांनी या शेतकऱ्यांचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला.
थेट गोळीबार आणि 'मोक्का'मधील आरोपीचा समावेश: शेतकरी कुंजीर बंधू स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अंधाराचा फायदा घेऊन नदीपात्रातून गावाच्या दिशेने धावत सुटले. ते पळत असताना मागे असलेल्या वाळू तस्करांनी त्यांच्यावर पिस्तुलातून थेट गोळीबार (Shootout) केला. सुदैवाने अंधार असल्याने तस्करांचा नेम चुकला आणि गोळी बाजूने निघून गेल्याने शेतकरी बालंबाल बचावले.
या हल्ल्यादरम्यान तस्करांनी शेतकऱ्यांना "तुम्हाला नीलेश शेंडगेसारखे संपवून टाकू," अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्याचे नेतृत्व श्रीरामपूर नगरपालिकेचा एक अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे हा करत होता. दाभाडे हा 'मकोका' (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आणि एका हत्या प्रकरणात आधीच फरार असलेला कुप्रसिद्ध गुन्हेगार आहे.
फरार असूनही तो राजरोसपणे वाळू उपसा आणि गुन्हेगारी कृत्य करत असल्याने स्थानिक प्रशासनावर आणि पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ९ जणांवर गुन्हा दाखल:या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे याला पकडून चोप दिला, मात्र तो तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरला.
याप्रकरणी पीडित शेतकरी जालिंदर कुंजीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वीरगाव (वैजापूर) पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे, उद्देश मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी ढमके, राहुल चव्हाण, विजय हटांगळे, मंगेश साळवे, विजय पवार आणि राहुल थोरात अशा ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
शहर
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
महाराष्ट्र
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सांगली: गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीतून पत्ता कट
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!

























Subscribe to my channel




