
बरेली: उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका चाळीस वर्षीय महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची आणि त्यानंतर अश्लील व्हिडिओच्या जोरावर ५० लाख रुपयांची मागणी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 'अल्टीमेट फिटनेस जिम'चे संचालक अकरम बेग आणि त्याचा भाऊ आलम बेग या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, ही जिम कॅबिनेट मंत्री धर्मपाल सिंह यांच्या भावाच्या मालकीच्या इमारतीत सुरू होती.
वजन कमी करण्याचे आमिष अन् अमली पेयाचा वापर
पीडित महिला डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून या जिममध्ये व्यायामासाठी जात होत्या. जिम चालक अकरमने त्यांना लवकर वजन कमी करण्याचे आमिष दाखवले आणि एका विशिष्ट 'प्री-वर्कआऊट ड्रिंक'मध्ये नशिल्या पदार्थांचे मिश्रण करून त्यांना पाजले. डॉक्टर बेशुद्ध पडल्यानंतर अकरमने त्यांना जिममधील एका खाजगी खोलीत नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याचा भाऊ आलम याने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले, तर खोलीत आधीच लावलेल्या हिडन कॅमेऱ्यातही हे सर्व कैद झाले.
५० लाखांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी
काही दिवसांनंतर आरोपींनी महिला डॉक्टरला हे व्हिडिओ दाखवून सुरुवातीला १० लाख आणि नंतर ५० लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने पीडितेने त्यांना ८० हजार रुपये दिले, मात्र आरोपींची भूक वाढतच गेली. त्यांनी डॉक्टरच्या घरी जाऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून अखेर पीडितेने ४ मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अनेक महिलांचे व्हिडिओ शूट केल्याची कबुली
पोलीस तपासात दोन्ही आरोपींच्या मोबाईल आणि पेनड्राईव्हमधून अनेक अश्लील व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. अकरमने कबुली दिली की, तो जिममध्ये येणाऱ्या महिलांशी जवळीक साधून त्यांना अमली पेय पाजत असे आणि नंतर त्यांचे व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करत असे. जिमच्या झडतीदरम्यान पोलिसांना अनेक संशयास्पद 'शक्तिवर्धक' औषधे, स्टिरॉइड्स आणि इंजेक्शनच्या सिरिंजही सापडल्या आहेत.
'जिम जिहाद'चा आरोप; हिंदू महासभेची चौकशीची मागणी
या घटनेनंतर हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष पंकज श्रीवास्तव यांनी याला 'जिम जिहाद' असे संबोधले आहे. जिमच्या नावाखाली हिंदू महिलांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, शहरातील सर्व जिमची सखोल चौकशी करण्याची आणि प्रत्येक जिममध्ये महिला ट्रेनर अनिवार्य करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
- नांदेड: डोळ्यांदेखत कारसह पत्नी वाहून गेली! नांदेडमध्ये बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नीचा शोध सुरू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?





























Subscribe to my channel




