राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याच्या अपघाती निधनाला जवळपास 20-22 दिवस उलटून गेले आहेत. 28 जानेवारीला ते मुंबईहून बारामतीला विमानाने जात होते, बारामती एअरपोर्टजवळ आल्यावर त्याचं विमान लँडिंग करताना क्रॅश झालं आणि मोठ्ठा स्फोट झाला. यामध्ये अजित पवारांसह आणखी चौघांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात असून हा अपघात नव्हे तर घातपात आहे असा आरोप अनेक लोक करत आहेत. अजित पवार यांचे पुतणे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar ) यांनीही हा संशय बोलून दाखवला असून त्यांनी गेल्या आठवड्यात मुबईत व दिल्लीत तसेच आज पुन्हा मुंबईत पत्रकार परिषद घेत नेक मुद्दे सविस्तर मांडले. विमानातील अतिरिकेत इंधन, ब्लॅकबॉक्स डॅमेज होणे, अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवतनाच रोहित पवार यांनी या अपघाताच्या चौकशीला होणार विलंब, त्यातील त्रुटीही दाखवून दिल्या.
तसेच अपघातग्रस्त विमान ज्या व्हीएस आर कंपनीचं आहे, त्याब्द्दल कंपनीच्या मालकाबद्दलही त्यांन काही दावे केले. तसेच सत्तेतल्या काी लोकांकडून कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा थेट आरोपही त्यांनी लावला. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही असा सवलाही त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले रोहित पवार ?
सत्तेचा वापर करून चौकशी करा ना, द्या ना प्राथमिक रिपोर्ट. आम्ही सत्तेत नसताना पुरावे देतोय. चौकशी का करत नाही याचं कारण रिपोर्ट तयार केला जातोय. व्हिएसआर कंपनीला वाचवलं जात आहे असा आरोप त्यांनी केला. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही ? असा सवालही त्यांनी विचारला.
या कंपनीचे मालक व्हिके सिंग आहेत, त्यांचा मुलगा रोहित सिंग याचं दीड- दोन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये लग्न झालं. तिथे कोण कोण गेलं होतं ? सत्तेतील काही लोकं, महाराष्ट्रातील माजी मंत्री, आंध्रप्रदेशच्या टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते हे तिकडे गेले होते. व्हिएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला जाता, आज जेव्हा व्हीएसआरवर (अपघातप्रकरणी) कारवाई करायची असते तेव्हा टीडीपीचे नेते म्हणतात की, चूक नाही. घात किंवा अपघात झाल्यापासून आतापर्यंत राज्याचे मंत्री व्हिएसआरने प्रवास करत आहेत. इतर राज्यांचे मंत्रीही प्रवास करत आहेत. सत्तेतील लोक व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. हैद्राबादचा बडा नेताही व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला.
कंपनीच्या मालकाला भारताबाहेर जायला कोणी मदत केली ?
अजित दादांच्या जाण्याने आम्ही दु:खात आहोत, अख्खा महाराष्ट्र दु:खात आहे. पण व्हीएसआर कंपनीचा मालक भारतात नाही. त्याला कुणी भारताबाहेर जायला मदत केली ? असा सवाल रोहिति पवार यांनी विचारला. कंपनीच्या मालकाला अटक करून चौकशी करायला हवी होती. पण ते भारताबाहेर आहेत. अमेरिकेत मायामीला गेले आहेत. व्हिएसआर कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक मुद्दाम मालकाला वाचवत आहेत,असा आरोप रोहित यांनी केला. अजित दादा गेले त्याचं काही नाही, पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून या कंपनीला मदत केली जात आहे असंही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्याला पदावरून दूर करा
या कंपनीवर आज ना उद्या बंदी घातली पाहिजे. याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत टीडीपीच्या (त्या) मंत्र्याला वेगळी जबाबदारी द्यावी, या पदावरून त्यांना दूर करा, त्यांना या पदावरून काढण्यात यावं. यात त्यांचं लिंकिंग असल्याने तपास नीट होत नाही. मंत्र्याचा या घातपातात हात आहे, असं म्हणत नाही. पण व्हिएसआरला तुम्ही वाचवत आहात, असं चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे. या मंत्र्यांच्या पार्टीचे लोक सिंगच्या लग्नाला गेले होते. व्हीएसआरची काही चूक नसल्याचे हे मंत्री म्हणत आहेत. त्यामुळे चौकशी होईपर्यंत त्या मंत्र्याला बाजूला करावं अशी मागणीही रोहित पवार यांनी करत टीडीपीच्या मंत्र्यावर निशाणा साधला.
रोहित पवारांनी काय केली विनंती ?
या अपघातात अजित पवारांसह आणखी चौघ मृत्यू पावले. त्यांच्यापैकी काहींच्या कुटुंबियाची रोहित पवारांनी भेट घेतली. त्याबद्दलही ते बोलले, विमानाची को – पायलट शांभवी पाठक या अपघातात गेली. तिच्या कुटुंबाला मी भेटलो. त्यांची एक मागणी आहे. सत्तेतील लोकच पूर्ण करू शकतील. सत्तेतील लोकांनी त्यांना भेटलं पाहिजे. केंद्र सरकारकडून ही मागणी पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ती विनंती करतो असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांचे अंगरक्षक विदिप जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली. जाधव यांच्या पत्नी ठाणे महापालिकेत कामाला आहेत. त्या परमंट नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत. पण त्यांना परमनंट करता आलं तर बरं होईल अशी मी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत भाऊ शिंदे यांना विनंती करतो , असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
शहर
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
महाराष्ट्र
- जालना: रेशीम धागा जगाला जोडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राज्यातील पहिल्या रेशीम कोष बाजारपेठेचे लोकार्पण, पहिल्याच लिलावात ९६१ रुपयांचा विक्रमी दर
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं


























Subscribe to my channel



