जे आज मिळाले नाही, ते आत्ताच मिळावे. जे उद्या मिळायचे असते ते ही आजच मिळावे. जे वेळेने तयार केले नाही त्याची ही प्राप्ती व्हावी. असा निसर्गामध्ये फक्त मनुष्याला हव्यास असतो. आज पृथ्वीचा पोटात बीज रोवले आणि उद्या काढून पाहिले की अंकुर फुटला कां नाही? परत दररोज पहिले, तर ते व्यर्थ दवडले जाईल. प्रत्येक निर्मिती ला योग्य वेळ आणि संधी दिली तरच वेळेत योग्य प्राप्ती होत असते. निसर्गाचा, पृथ्वीचा पर्यायाने काळाचा एक नियम असतो. प्रत्येक निर्मितीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागत असतो. अर्थात योग्य वेळेपूर्वी निर्मिती होत नसते आणि म्हणूनच घाई करुन प्राप्तीचा प्रयत्न करु नये. याचा अर्थ, प्रयत्न, कष्ट, मेहनत करू नये किंवा आपल्या उत्कृष्ट ध्येया प्रती उदासीन रहावे असा नव्हे. निसर्गाचेच पहा : सूर्य त्याच्या वेळेवर उगवतो तुम्ही वाट पहा अथवा नका पाहू, तुम्ही प्रार्थना करा अथवा नका करू. कळीचे फुल योग्य वेळ झाल्यावरच उमलते. कुठल्याही झाडाला त्याची फळे यायला योग्य मोसमच लागतो. मोसमा पूर्वी नैसर्गिक पद्धतीने कधीही फुलं, फळं येत नाहीत. मूल थोडेसे मोठे झाल्यावरच त्याला वयानुसार योग्य तशी समज यायला लागते. सूर्य त्याच्या वेळेनुसार मावळतो. प्राणी पक्षी वेळेनुसार घराकडे जातात. पावसाळ्यात पाऊस पडतो, नद्या,नाले,ओढे वाहू लागतात. योग्य मोसमातच काही पक्षी प्राणी स्थलांतर करतात. चंद्रही त्याच्या वेळेनुसारच दिसायला लागतो. चांदणं दिसायलाही योग्य वेळच लागते. शितल शांतता मध्यरात्रीनंतरच येते. पहाट वेळेनुसार होते. पाखरांची किलबिल वेळेवरच सुरू होते. सर्व गोष्टी, उत्पत्ती आणि निर्मितीची प्रक्रिया ही काळाशी संबंधित आहे. अर्थात कालप्रमाण निसर्ग सिद्ध आहे. ते बद्ध आणि नियमशीर आहे. या सर्वांमध्ये घाई फक्त मनुष्याला असते. कोणता प्राणी झाडाला फळे लागल्याशिवाय झाडाखाली उड्या मारत नाही. तसेच कोणताही पक्षी झाडाला फळे आल्याशिवाय तेथे जाऊन खाद्य मिळण्याची अपेक्षा करत नाही. मग माणसानेच कोणत्याही वस्तूची नियमापूर्वी प्राप्तीची अपेक्षा का करावी? घाई मध्ये माणूस नेहमीच नक्कीच चुकत असतो. माणूस या साठी चुकतो की त्याला लोभ, मोह, वासना, स्पर्धा, प्राप्तीची इच्छा, संग्रह, ख्यातीमोह, मोठेपणा, गर्व,अहंकार या अनेक प्रकारच्या प्रवृत्ती असतात. अर्थातच या संस्कार, साधना आणि अज्ञानामुळे प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. कोणात कोणती प्रवृत्ती अधिक तर दुसरी प्रवृत्ती थोडीशी कमी. मात्र या सर्व प्रवृत्ती सर्व व्यक्तींमध्ये दिसून येतात. व्यक्ती अवेळी प्राप्तीचा व्यर्थ आटापिटा करतो. त्यामध्ये तो स्वतःचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक स्वास्थ्य हरवून बसतो. त्याच्या या हव्यासाचे, लोभ-मोहाचे विपरीत परिणाम मात्र समाजाला भोगावे लागतात. आपण संग्रह केला की कुठेतरी त्याची उणीव निर्माण झालेली असते. मोठ्या प्रमाणावर वस्तू दाबून ठेवल्या की बाहेर त्याची किंमत महागाई वाढलेली असते. म्हणूनच आज या ठिकाणी इतकेच व्यक्त व्हायचे आहे की निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालावे, निर्मितीच्या प्रक्रियेला वेळ द्यावा, वेळेपूर्वी प्राप्तीची इच्छा नको. ध्येयप्राप्ती साठी मात्र कष्ट, मेहनत मार्गक्रमण चालू असावे. रोजची कर्तव्य रोजच करावीत. परंतु नको त्या गोष्टीचा हव्यास नको. निसर्ग नियमांनुसार, विश्वाच्या व्यवस्थेनुसार काही गोष्टी वेळेवरच मिळत असतात यावर विश्वास असावा. (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
महाराष्ट्र
- पुणे: पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाची आत्महत्या; लोहगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल
- नवी मुंबई: सीबीडी बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; १७ वर्षीय विद्यार्थी थोडक्यात बचावला, लोकल सेवा विस्कळीत
- पुणे: मंचर-कलंब परिसरात शेतातील कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का लागून महिलेचा जागीच मृत्यू
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
गुन्हा
- पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये पहाटेच्या सुमारास खिडकी तोडून घरात घुसले तीन चोरटे; बेडरूममधून सोन्याचे मंगळसूत्र आणि ऐवज लांबवला, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




