नवी मुंबई: सीबीडी बेलापूर (CBD Belapur) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटना समोर आली आहे. बेलापूर येथील प्रसिद्ध पारसिक हिल डोंगरावरून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका १७ वर्षीय विद्यार्थ्याची चालती कार थेट सुमारे ७० फूट खोल कड्यावरून खाली बेलापूर-उरण रेल्वे रुळावर जाऊन कोसळल्याची भयानक घटना घडली आहे. सुदैवाने या भीषण अपघातात तरुण थोडक्यात बचावला असून, त्याला गंभीर दुखापतीतून वाचवण्यात यश आले आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे रेल्वे स्टेशन आणि परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास पारसिक हिल रोडवरील विश्वनाथ महाराज समाधी मंदिराच्या परिसरावरून एक १७ वर्षीय बारावीचा विद्यार्थी 'होंडा सिटी' कार चालवत जात असताना अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कार रस्त्याकडच्या झाडीमधून थेट डोंगरावरून खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळली. कार थेट खाली पडत असताना रस्त्यामधील झाडे आणि झुडपांमुळे अपघाताचा जोर काहीसा कमी झाला, अन्यथा मोठी जीवितहानी होऊ शकली असती. कार दोन्ही रेल्वे रुळांच्या मधोमध जाऊन पडली आणि ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आली नाही, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले होते. कारमध्ये असलेला १७ वर्षीय विद्यार्थी (जो टर्भे येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे) गाडीच्या मागच्या सीटवर जखमी अवस्थेत आढळला. घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिक, पोलीस तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन संयुक्तपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवले आणि जखमी तरुणीला कारमधून सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी सीबीडी बेलापूर येथील एमजीएम (MGM) रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे बेलापूर-उरण मार्गावरील लोकल रेल्वे सेवा सुमारे दीड ते अडीच तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दुर्घटना मदत ट्रेन (ART) आणि पथक पाठवून क्रेन व ट्रॅकवरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे १५० मीटर ट्रॅकवर सरकवून अपघातग्रस्त कार बाजूला केली व रेल्वे मार्ग पूर्ववत सुरू केला. प्राथमिक तपासात ही कार मित्राच्या नावे असल्याचे समोर आले असून, नेमका अपघात कसा घडला याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




