
Pune : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरूच असल्याने राज्यातील थंडी वाढली आहे. पहाटे धुक्याची दुलई पांघरली जात असून दव पडत आहे. उद्या (ता. १७) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा दहा अंशांखाली घसरला आहे. कमाल तापमानात हळूहळू घट होत असून निवडक ठिकाणी पारा अद्यापही तिशीपार आहे. पहाटे जाणवणारी हुडहुडी सकाळी उशिरापर्यंत टिकून राहत असून, दुपारी चटका वाढल्याचे
|
Mumbai : मुंबई नौदल गोदीवर दहशतवादी हल्ल्याची धमकी; जहांगीरला अटक, धक्कादायक तपशील उघड |
अनुभवायला मिळत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू आणि रत्नागिरी येथे ३४.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारी निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी आठ अंश तापमान नोंदले गेले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये ८.५ अंश तापमानाची नोंद झाली. जेऊर, गोंदिया आणि भंडारा येथे दहा अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाल्याने थंडीची लाट होती. जळगाव, मालेगाव, नाशिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे पारा अकरा अंशांच्या खाली असल्याने
किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे समजले जाते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यापाठोपाठ आता विदर्भात देखील काही ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. उद्या (ता. १७) नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट कायम राहणार असल्याने सावधगिरीचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
येलो अलर्ट
नंदुरबार
धुळे
जळगाव
जालना
छत्रपती संभाजीनगर
बीड
परभणी
हिंगोली
नांदेड
लाटेची ठिकाणे (अंश सेल्सियस)
धुळे ८
निफाड ८
परभणी (कृषी) ८.५
जेऊर ९
गोंदिया ९.६
पुण्यात थंडीचा कडाका वाढला
गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. परिणामी शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात रविवारी लक्षणीयरीत्या घट झाली आहे. जिल्ह्यातील हवेलीत ८.६ आणि माळीणमध्ये ९.९ येथे किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदविण्यात आले आहे. हे यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान असून, पाषाण परिसरात
१०.१ आणि शिवाजीनगर परिसरात १०.६ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. परिणामी, पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये गारठा वाढला आहे.
पुणे आणि परिसरामध्ये सोमवारी (ता. १७) कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता असून कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. मंगळवारपासून (ता. १८) पुढील तीन दिवस कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील तापमान (अंश सेल्सिअस)
हवेली ८.६
माळीण ९.९
पाषाण १०.१
तळेगाव १०.५
माळीण ९.९
पाषाण १०.१
तळेगाव १०.५
शिवाजीनगर १०.६
बारामती १०.५
दौंड ११.१
आंबेगाव ११.७
कुरवंडे १३.१
भोर १३.७
गिरिवन १४.६
कोरेगाव पार्क १४.७
चिंचवड १५.३
लवळे १६.४
वडगाव शेरी १६.६
शहर
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
महाराष्ट्र
- मुंबई: ठाणे जिल्ह्यातही सार्वजनिक उत्सवांमध्ये डॉल्बी आणि लेझर लाईट्सवर पूर्ण बंदी घाला; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आक्रमक मागणी
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कथित भ्रष्टाचार; सभापतींच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
- बीड: शासनाने १२ मागण्या मान्य केल्यावरही मुंबई मोर्चाचा अट्टहास का? ज्योती मेटे यांचे मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर गंभीर सवाल
- कोल्हापूर: गुंतवणुकीच्या परताव्याचे आमिष दाखवून अडीच कोटींची फसवणूक; कोकणातील कसाल-गिम्वी येथून तीन जणांना बेड्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा






























Subscribe to my channel



