
Pune : शहरी गरीब योजनेंतर्गत पूना हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आठ तासांनी मृतदेह ताब्यात दिल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नातेवाइकांनी तक्रार केली आहे. पूना हॉस्पिटलमध्ये महेश पाठक (वय ५३, शुक्रवार पेठ) उपचार घेत होते. त्यांचा २५ एप्रिलला रात्री १.३० वाजता मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांना देयक (बिल) विभागात पाठविण्यात आले. ‘रुग्णावर शहरी गरीब योजनेअंतर्गत उपचार सुरू असल्याने त्यांचा मृतदेह सकाळी ८.३० वाजता नेता येईल, असे देयक विभागातील कर्मचाऱ्याने सांगितले. ‘आत्ता देयक तयार करण्यास कोणी नसते, तुम्ही सकाळी या,’ असे सागंण्यात आले,’ असे रुग्णाचे नातेवाइक व अग्निशामक विभागाचे अधिकारी नीलेश महाजन यांनी आरोग्य विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
‘सकाळी ८.२० वाजता नातेवाइक रुग्णालयात गेले. त्यानंतर ८.४५ वाजता देयक विभागातील कर्मचारी आले. ‘वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत, ९.३० वाजेपर्यंत थांबावे लागेल,’ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. नातेवाइकांनी रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना भेटू देण्याची विनंती केली. मात्र, दोन्ही अधिकारी १० वाजता येतात, असे सांगण्यात आले. अखेर सकाळी ९.३० वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याचबरोबर देयक विभागाने ७ हजार रुपयांची परताव्याची रक्कम द्यायची आहे, असेही नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे केवळ देयकावर प्रक्रिया करण्यासाठी मृतदेह आठ तास रोखून ठेवण्यात आल्याने रुग्णालयावर कारवाई करावी,’ असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
|
|
या प्रकाराबाबत पूना हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी रेणू कटारे म्हणाल्या, ‘या रुग्णाचा मृत्यू रात्री १.३० वाजता झाला. सर्वसाधारणपणे रात्री उशिरा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइक मृतदेह सकाळीच नेतात. त्यामुळे रुग्णालयातील देयक विभाग रात्री सुरू नसतो. रुग्णालयात रात्रीच्या वेळी आपत्कालीन विभागातील कर्मचारी अंदाजे देयक करतात. त्यांनी अंदाजे देयकाची रक्कम नातेवाइकांना सांगितली. ती भरून नातेवाईक मृतदेह घरी घेऊन जाऊ शकले असते. मात्र, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये योग्य संवाद न झाल्याने हा प्रकार घडला.’
रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने याप्रकरणी चौकशी केली जाईल. सर्व बाबींची तपासणी केल्यानंतर समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे रुग्णालयावर योग्य ती कारवाई केली जाईल.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




