
Pune : "शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत, यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी," असा आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी दिला.
नवले पुलाच्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघाताची संबंधित यंत्रणांनी तत्काळ चौकशी करावी, या मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशाही सूचना त्यांनी या वेळी दिल्या पुणे शहरातील वाहतूक सुधारणेबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी त्यांनी सूचना दिल्या.
|
Pune : पुण्यात खासगी ट्रॅव्हल्ससाठी बदलले नियम! नवीन रूट सिस्टमची अंमलबजावणी सुरू |
या वेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, पुणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, 'एनएचएआय'चे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते. 'सेव्ह लाइफ फाउंडेशन'चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
'सेव्ह लाइफ फाउंडेशन'ने तीन-चार वर्षापूर्वी नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविण्याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. त्याअनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने अनेक उपाययोजना केल्या होत्या. पुन्हा या मार्गाचा सविस्तर अभ्यास 'फाउंडेशन'ने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने करावा, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या. तर, 'अहवाल दोन आठवड्यात सादर करू, असे आश्वासन तिवारी यांनी या वेळी दिले.
'शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला दंड केला जावा. तसेच, तीनपेक्षा अधिकवेळा उल्लंघन झाल्यास संबंधितांचा वाहनचालक परवाना नियमानुसार निलंबित करणे आणि त्यानंतरही उल्लंघन केल्यास जप्त करण्याची कारवाई करावी,' असेही डॉ. पुलकुंडवार म्हणाले. तर 'रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी दरमहा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. आधीच्या बैठकीत सुचविलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण होतील, याची खात्री करावी,' असेही ते म्हणाले.
शहर
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
- नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!
महाराष्ट्र
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
- मुंबई: मुलुंडमधील लेबर कॅम्पमध्ये भीषण आग; एकापाठोपाठ आठ सिलिंडरचे स्फोट, ३०० हून अधिक कामगार सुखरूप!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!
























Subscribe to my channel



