सामान्यांसाठी आणि गरीब रुग्णांसाठी आधारवड मानल्या जाणाऱ्या बीडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा अत्यंत भोंगळ, निंदनीय आणि अक्षम्य हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांनी आपल्या पेशाला काळीमा फासत एका अवघ्या १९ वर्षीय नवविवाहित मातेचे 'आईपण' कायमचे हिरावून घेतल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. प्रसूतीसाठी आलेल्या या तरुणीची सिझेरियन (C-Section) शस्त्रक्रिया करताना ड्युटीवर असलेल्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी चक्क सर्जिकल हातमोजे (Gloves), कापसाचा बोळा आणि कागदी साहित्य तिच्या पोटातच विसरून शिलाई मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर वैद्यकीय हलगर्जीपणामुळे पीडित महिलेच्या पोटात जंतूसंसर्ग (Infection) होऊन पू झाला, ज्यामुळे तिचे आतडे सडले आणि शेवटी तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात आपत्कालीन शस्त्रक्रिया करत गर्भाशय काढावे लागले. सध्या ही नवमाता पुण्यातील रुग्णालयात मृत्यूशी ο अत्यंत गंभीर झुंज देत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संध्या गायकवाड असे या दुर्दैवी १९ वर्षीय पीडित नवमातेचे नाव आहे. १ ऑगस्ट रोजी प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिच्यावर सिझेरियन (प्रसूती शस्त्रक्रिया) पार पडली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस सर्व ठीक असल्याचे भासवून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि घरी पाठवण्यात आले. परंतु, घरी आल्यावर काहीच दिवसांत संध्या यांना पोटात असह्य कळा, तीव्र वेदना आणि सतत उलट्यांचा त्रास सुरू झाला. कुटुंबियांनी याबद्दल बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडे धाव घेतली आणि त्रास होत असल्याचे सांगितले, मात्र सुरुवातीला डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष करत तो साधी पित्ताचा त्रास असल्याचा गैरसमज करून काही साधी औषधोपचार देऊन टाळाटाळ केली.
दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालल्याने जेव्हा वेदना थांबल्या नाहीत, तेव्हा कुटुंबियांनी तिला तातडीने एका खासगी रुग्णालयात नेऊन सोनोग्राफी व इतर तपासण्या केल्या. या वैद्यकीय तपासणीदरम्यान जी माहिती समोर आली, त्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. बीड जिल्हा रुग्णालयात झालेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे पोटात सर्जिकल हॅन्डग्लोव्हज, कापसाचा बोळा आणि कागदी रुमाल आतच राहिल्याचे निष्पन्न झाले. या परकीय वस्तूंमुळे पोटात तीव्र संसर्ग होऊन पू पसरला होता आणि अंतर्गत अवयव सडू लागले होते. खाजगी रुग्णालयातील उपचाराचा अवाढव्य खर्च परवडण्यासारखा नसल्यामुळे आणि प्रकृती अतिशय चिंताजनक बनल्याने, हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी पुण्याच्या दिशेने हलवले.
पुण्यातील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये फिरल्यानंतर अखेर तिला पुण्याच्या ससून सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तातडीने तपासणी करून तिच्यावर दोन अत्यंत जटिल आणि मोठ्या आपत्कालीन शस्त्रक्रिया पार पाडल्या. या प्रक्रियेदरम्यान तिच्या पोटातून ते डागलेले हातमोजे व इतर साहित्य बाहेर काढण्यात आले, परंतु तोपर्यंत उशीर झाल्यामुळे तिचे सडलेले आतडे आणि खराब झालेले गर्भाशय डॉक्टरांना काढावे लागले. जन्माला आलेल्या आपल्या नवजात बालकाला अजून नीट कुशीतही घेता न आलेल्या त्या तरुण मातेवर ओढवलेल्या या भीषण प्रसंगामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आणि प्रचंड जनक्षोभ उसळल्यानंतर आरोग्य प्रशासनाला जाग आली आहे. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक सतीशकुमार सोळंके यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित जबाबदार डॉक्टर व ऑपरेशन थिएटरमधील संबंधित कर्मचाऱ्यांना 'कारण दाखवा' (Show Cause) नोटीस बजावली असून अंतर्गत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, केवळ नोटीस न देता दोषींवर कठोर कायदेशीर सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांमधून व नातेवाईकांकडून केली जात आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




