
Pune : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी “डिजिटल होम अरेस्ट”च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा मानसिक आणि आर्थिक धक्का बसल्यानं संबंधित वृद्ध व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार ८० वर्षीय महिलेने पुणे सायबर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्या आपल्या पतींसह टिंगरे नगर परिसरात गेल्या २५ वर्षांपासून वास्तव्यास होत्या. त्यांच्या तीन मुली परदेशात असून, पती शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते आणि पेन्शनवर उदरनिर्वाह करत होते.
|
Pune : पुण्यात धावत्या बसला आग! २० प्रवाशांचा थरारक बचाव , चालकाच्या तत्परतेमुळे टळला मोठा अनर्थ |
घटनेचा तपशील असा की, ऑगस्ट महिन्यात सायबर चोरट्यांनी संबंधित वृद्ध व्यक्तीला फोन करून स्वतःला कुलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी म्हणून ओळख दिली. त्यांनी सांगितलं की, एका गुन्हेगारी प्रकरणात त्यांच्या नावाने बँक खाते वापरले गेले आहे, आणि त्या खात्यातून करोडो रुपयांचा व्यवहार झाल्याचं सांगून वृद्धाला घाबरवलं.
यानंतर, दुसऱ्या नंबरवरून एका व्यक्तीने स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून ओळख दिली आणि “मानवी तस्करी” प्रकरणात त्यांचं नाव असल्याचं सांगितलं. त्यांनी विचारलं — “तुम्हाला जेल अरेस्ट हवं का होम अरेस्ट?”
घाबरलेल्या वृद्धाने “होम अरेस्ट द्या” असं सांगताच, चोरट्यांनी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या बँक खात्याची पडताळणी करण्याचा बहाणा केला. त्या प्रक्रियेतून १ कोटी १९ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले.
या फसवणुकीनंतर वृद्धाने २२ सप्टेंबर रोजी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि ऑनलाइन पोर्टलवरही अर्ज दिला. मात्र, अटकेच्या भीतीने ते मानसिकदृष्ट्या खचले होते. चोरट्यांनी धमकी दिली होती की, “तुम्ही कुणाला काही सांगितलं तर तुमच्या मुलींना त्रास होईल.”
या सततच्या मानसिक तणावामुळे वृद्ध व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु आर्थिक नुकसान झाल्याने उपचारांचा खर्च उचलता न आल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, तक्रार सप्टेंबरमध्ये दाखल झाल्यानेही पोलिसांनी तत्काळ कारवाई केली नाही, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, वृद्धाच्या मृत्यूनंतर अखेर २५ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना पुन्हा एकदा दाखवते की, सायबर गुन्हेगारांचे डाव अधिक धोकादायक आणि भावनिकदृष्ट्या त्रासदायक होत आहेत.
शहर
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
महाराष्ट्र
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
- कोल्हापूर: तेरवाडमध्ये भरधाव कंटेनरचा थैमान; पादचारी महिला व दुचाकीस्वारांना चिरडल्याने चारजण जागीच ठार, चालक पसार
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
























Subscribe to my channel



