
Pune : कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळवायची असेल, तर त्याकडे कोणती पात्रता हवी? कार्यकर्त्यांची फौज, मतदारांचा पाठिंबा ही झाली प्राथमिक अत्यावश्यक बाब. मात्र, आता एवढ्यावर उमेदवारी मिळत नसते. आर्थिक बळ आणि वेळप्रसंगी ‘शक्तिप्रदर्शन’ करण्याची क्षमता असलेला उमेदवार हा राजकीय पक्षांसाठी हमखास यश मिळवून देणारा मानला जातो. अशावेळी मतदार संघातील त्याची प्रतिमा कशी आहे, याला महत्त्व राहात नाही. त्याऐवजी उमेदवार खर्च किती करू शकतो, याला प्राधान्य देत तिकिटांचे वाटप केले जाते. त्यामुळे सध्या निवडणुकीत वारेमाप खर्च पाहायला मिळतो; पण पुण्यात एक काळ असा होता की एक दमडीही खर्च न करता मतदारांच्या मतांच्या जोरावर लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षे निवडून येत होते. ‘माये’ची पखरण नसतानाही केवळ मतदारांच्या प्रेमावर!
बदलेल्या काळानुसार आता निवडणुकीला उभे राहणे, हे सोपे राहिलेले नाही. निवडणूक लढवायची, तर पहिले स्थान हे जनमानसातील प्रतिमेपेक्षा आर्थिक बळ किती आहे, याला दिले जाऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच इच्छुकांकडून आर्थिक बळाचे प्रदर्शन सुरू होते. वेगवेगळे मेळावे घेत भेटवस्तूंची खैरात केली जाते. जास्तीत जास्त मतदारांना खुश करण्यासाठी चढाओढ सुरू होते. त्यातून होणाऱ्या शक्तिप्रदर्शनातून राजकीय पक्षांसाठी उमेदवार निवडीचे पर्याय उपलब्ध होतात. उमेदवारी मिळाली की, मतदारांवर ‘माये’ची पखरण सुरू होते. मग धनशक्तीचा वापर करत निवडणूक काबीज करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जातो. त्यामुळे सध्या कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराची आर्थिक कुवत हा महत्त्वाचा निकष झाल्याने सामान्य कार्यकर्त्याच्या क्षमतेबाहेर निवडणूक गेली आहे.
मात्र, पुण्यात अनेक लोकप्रतिनिधी हे निवडणुकीत खर्च न करताही मतदारांच्या पाठिंब्यावर निवडून येत होते. शंकर गणेश लवाटे हे तत्कालीन नगरपालिकेतील सभासद होते. ते रोज एकटेच मतदार संघात प्रभातफेरी काढून नागरिकांनी मद्याप्राशन करू नये, यासाठी सकाळी गाणे म्हणत लोकजागृती करायचे. निवडणुकीसाठी ते एक दमडीही खर्च करायचे नाहीत. मतदानाच्या दिवशी ते मंडईजवळ हात जोडून उभे असायचे आणि निवडून यायचे. आता लाखो रुपयांची उधळण करूनही निवडून न येणाऱ्या सध्याच्या उमेदवारांसाठी हे उदाहरण आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.
गोपाळराव महाजन नावाचे तत्कालीन नगरपालिकेचे सभासद होते. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला अनामत रक्कम भरावी लागायची. ती रक्कमही त्यांच्याकडे नसायची. ते एक महिन्यासाठी कोणाकडून तरी ती रक्कम मागून घेत असत आणि उमेदवारी अर्ज दाखल करत. प्रचारासाठी एक दमडीही खर्च न करता ते निवडून यायचे. कोणाच्याही घरात निधनाची घटना घडली की, ते मदतीसाठी पुढे असायचे. अंत्यसंस्कारासाठी लोकांना गोळा करण्याबरोबरच अंत्यसंस्कार करेपर्यंत सर्व गोष्टींसाठी ते सहकार्य करायचे. नारायण पेठेतील मतदार हे त्यांना निवडून द्यायचे. लवाटे आणि महाजन हे दोन सभासद आदर्श लोकप्रतिनिधी कसे असावेत, हे दाखवून द्यायचे. पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येते, असा भ्रम असणाऱ्या राजकारण्यांसाठी त्यांची आठवण ठेवली तरी पुरेसे आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीत पैशाचा गैरवापर होऊ नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिसांची पथके नेमण्यात आली आहेत. त्यांच्याकडून रक्कम जप्त करण्यात येत आहे. सर्वत्र हे प्रकार आढळून येत आहेत. असे प्रकार सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांना ‘सी व्हिजील’ या उपयोजनवर तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यावर दररोज हजारो तक्रारी येत आहेत. तरीही बेहिशेबी रकमा पोलीस पथकांना सापडत आहेत. हे प्रकार थांबायला तयार नाहीत. ही रक्कम कोठून आणली, याची चौकशी यशावकाश आयकर विभागाकडून करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत निकाल लागून उमेदवारांनी कार्यभार साधला असेल.
आता तर नेत्यांच्या बॅगा तपासायला सुरुवात झाल्याने त्यावरून आरोप-प्रत्यारोप, मान-सन्मानाचा प्रकार सुरू झाला आहे. निवडणुका या एक दमडीही खर्च न करता जिंकता येतात, हे पुण्यातील लोकप्रतिनिधींनी दाखवून दिले होते, याचे स्मरण राजकारण्यांनी ठेवले, तरी पुरे झाले.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




