
New Delhi Railway Station Stampede : एक छोटी चूक अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरू शकते, याचं उदाहरण म्हणजे शनिवारी रात्री दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना होय. महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवर जमलेल्या भाविकांपैकी १८ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये १४ महिला आणि तीन मुलांचा समावेश होता. या दुर्घटनेत १० गंभीर जखमी आहेत, त्याशिवाय अनेकांना दुखापत झाली आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री दहा वाजता ही दुर्घटना झाली. किंकाळ्या, आराडाओरड, अन् धावपळ यामुळे १८ जणांचा जीव गेलाय. रेल्वेचं ढिसाळ नियोजन अन् अतिरिक्त दिलेली तिकिटे यामुळे ही दुर्घटना झाल्याचे समोर आलेय.
महाकुंभला जाणाऱ्या दोन ट्रेन उशीरा आल्या, त्यात ४०० जागांसाठी रेल्वेकडून १५०० तिकिटांची विक्री करण्यात आली. त्याशिवाय रेल्वे स्टेशनवर गर्दीवर नियंत्रणासाठी कुणीही नव्हते, परिणामी चेंगराचेंगरीची घटना घडली अन् १८ जणांचा जीव गेला. १० जण गंभीर जखमी आहेत. शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर रात्री १० ते ११ वाजेदरम्यान दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर रेल्वेकडून मदतीची घोषणा कऱण्यात आली आहे. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री, रेल्वे मंत्री अन् राष्ट्रपती यांच्याकडून दु:ख व्यक्त करण्यात आलेय.
|
|
सुरक्षित समजलेल्या जाणाऱ्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर एकाच वेळी हजारो लोक कसे जमले? गर्दी नियंत्रणात का आली नाही? रेल्वेने काय चुका केल्या? वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणताही यंत्रणा नव्हती का? १८ जणांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? यासारखे प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या वक्तव्यानंतर या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे दिसतेय.
महाकुंभासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून दोन स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. शनिवारी सुट्टीचा दिवस, त्यामुळे महाकुंभात जाण्यासाठी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली. महाकुंभात जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दीचा उच्चांक गाठला होता, शेकडो लोक जनरल तिकिटांसाठी जमले होते. प्लॅटफॉर्म १४ आणि १५ वर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पण दोन्ही ट्रेन उशीरा आल्या.
कोणत्याही ट्रेनमध्ये जवळपास चार जनरल बोगी असतात. दोन बोगी ट्रेनच्या इंजिनकडे तर दोन बोगी मागील बाजूला असतात. प्रत्येक बोगीमध्ये जवळपास १०० सीट असतात. जनरल बोगीमधून फक्त बसून प्रवास केला जातो. जनरल बोगीमधून मोजक्याच जागा उपलब्ध होत्या. मात्र रेल्वेकडून जनरलची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली केली. प्रत्येक तासाला जवळपास १५०० तिकिटांची विक्री करण्यात आली. म्हणजे ४०० जागांसाठी शेकडो तिकिटांची विक्री करण्यात आली. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धावधाव झाली. रेल्वेकडून गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कोणतीही उपाययोजना नव्हती. रेल्वे विभागाला स्थानकावरील गर्दीचा अंदाज आलाच नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वंतत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस या दोन्ही उशीरा धावत होत्या. त्यामुळे त्या ट्रेनमध्ये जाणारे लोक प्लॅट फॉर्म १२ अन् १३ वर उभे होते. प्लॅटफॉर्म अन् जिन्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. रात्री ९.३० वाजता प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १५ वर पोहचली, ट्रेनमध्ये चढण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात होती की श्वास घ्यायलाही जागा नव्हते. धक्काबुक्की अन् आरडाओरड यातच चेंगराचेंगरी झाली. धक्कादायक म्हणजे ही दुर्घटना घडत होती, त्यावेळी सुरक्षा रक्षक , आरपीएफ अथवा रेल्वेचे कोणतेही अधिकारी तिथे उपस्थित नव्हते. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याचा रेल्वेला अंदाज आला नव्हता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली.
दिल्ली रेल्वे स्टेशनवर रात्री चेंगराचेंगरी झाली, त्यावेळी लोकांना श्वास घ्यायलाही जागा नव्हती. लोक अंगावर पाय ठेवून धावत होते. जिन्यावर गर्दी, प्लॅटफॉर्मवर गर्दी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेत जागा मिळवण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच पोलिस आणि फायर ब्रिगेडची पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा जीव गेला, त्याशिवाय अनेकजण जखमी आहेत. रेल्वे मंत्रालयाकडून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. चेंगराचेंगरीत मृत झालेल्याच्या कुटुंबियाला १० लाख, गंभीर जखमी असणाऱ्याला २.५ लाख, जखमी असणाऱ्यांना एक लाख रूपयांच्या मदतीची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




