
Nashik News : इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आणि नागपूर-मुंबई रेल्वेलाइनवरून गेलेला ६१ वर्षे जुना पुलाचा मोठा कठडा कोसळल्याची घटना बुधवारी (ता. २९) पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग खचल्याने शहराची दोन भागात विभागणी झाली तर इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या.
रेल्वेरूळाच्या थोडा मागे पूल खचल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी दीड महिना लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
|
Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ३ तासांचा ब्लॉक; या पर्यायी मार्गांचा करा वापर |
बुधवारी पहाटे पुलावरून सुरळीत वाहतूक सुरू असताना ही घटना घडली. रस्ता खचायला सुरवात झाली तसे वाहनचालक थांबले. पाहता पाहता रस्त्याचा एक मोठा भाग खचून केला आणि पुलावरील वाहतूक बंद झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी अथवा नुकसान झाले नाही. परंतु या घटनेमुळे शहराचे दोन भाग झाले आहे. इंदूरकडून येणारी, तसेच नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव या मार्गावरील वाहतुकीला याचा मोठा फटका बसला आहे.
वाहतूक बंद करण्यात आल्याने वाहने जागच्या जागी थांबल्याने मोठ्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे या पुलाच्या खालून मुंबई-नागपूर रेल्वेलाइन गेली आहे. ही घटना रूळाच्या मागे घडल्याने मोठी दुर्घटना टळली. शहरातून जाणाऱ्या बस आज गेल्या नाही. प्रवासी वाहतुकीसह इंधन वाहतूक, अत्यावश्यक सेवांची सेवा मनमाड, लासलगाव, विंचूर, येवला, तसेच नांदगाव, राजापूर, नगरसूल, येवला या दोन्ही मार्गाने होऊ शकते.
पुणे मार्ग येणारी वाहतूक येवला येथून, तर इंदूरमार्गे येणारी वाहतूक मालेगाव येथून वळविण्यात आली आहे. तसेच शहरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या ही वाहतूक आनंदवाडी, कऱ्ही वंजारवाडी रस्ता ते गर्डर शॉपमार्गे शहरात येणाऱ्या रस्त्यावरून सुरू आहे.
शहरातील दोन्ही भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी रेल्वेस्थानकावर असलेला पादचारी पूल नागरिकांसाठी खुला करावा लागणार आहे. तरच शहरातील नागरिकांची सोय होऊ शकते. पुलाच्या दुरुस्तीसाठी साधारणतः दीड महिना लागणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सदर पूल दीड महिन्यांसाठी बंद असणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



