
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरात काल शनिवारी दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गांगापूर कालवा परिसरातील झोपडपट्टीत दारूच्या नशेत असलेल्या शेजाऱ्याने किरकोळ वादातून माय-लेकींच्या डोक्यावर लाकडी दांड्याने जोरदार वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत पार्वता शंकर फुकट (वय 65) आणि त्यांची मुलगी संगीता वसंता रिठे (वय 40), दोघीही रा. गांगापूर, उमरेड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी नितेश किसन ठाकरे (वय 31), रा. गांगापूर झोपडपट्टी, उमरेड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतक माय-लेकी शेजारी राहत होते. आरोपी नितेशला दारूचे व्यसन असून तो नशेत वारंवार शेजाऱ्यांशी वाद घालत असल्याची माहिती आहे. यापूर्वीही आरोपी आणि मृतकांमध्ये अनेकदा वाद झाले होते. काल शनिवारी दुपारी सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास गांगापूर झोपडपट्टीतील मृतकांच्या राहत्या घरासमोर आरोपी नितेश आणि पार्वता फुकट यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद पाहता पाहता विकोपाला गेला. वादाच्या भरात दारूच्या नशेत असलेल्या नितेशने जवळच असलेला लाकडी दांडा उचलला आणि पार्वता फुकट यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. यात आईचा आवाज ऐकताच आईला वाचवण्यासाठी मुलगी संगीता रिठे तीला वाचवण्यासाठी मध्ये पडली असता आरोपीने तिच्याही डोक्यावर वार केले. या हल्ल्यात दोघीही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
|
Pune : बंडू आंदेकरला मोठा धक्का; माजात गेलेला आता अडचणीत, निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह? |
घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी फिर्यादी सौ. स्मिता पंकज जुमडे (वय 36) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी नितेश ठाकरे याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलीस करीत आहेत. भरदिवसा घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे उमरेड शहरासह संपूर्ण नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान





















Subscribe to my channel


